अनिल चौधरी, पुणे
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभाग, शासनाच्या परिपत्रकानुसार ज्या क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करता येत नाही.त्यामुळे सोमवार दिन.१८ मार्च रोजी मनपाचा परिमंडळ उपायुक्त स्तरावरील लोकशाही दिन होणार नाही , तशी नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यातआली आहे.