आदर्श आचार संहितेचे सर्वांनी काटेकारपणे पालन करावे;अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे

939

शैलेंद्र चौधरी,नंदुरबार

:भारत निवडणूक आयेागाने 17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून तेंव्हापासून जिल्हयात सर्वत्र आदर्श आचार संहिता लागू झाली असून आदर्श आचारसंहिताचे काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी नंदुरबार 01 लोकसभा मतदार संघात निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्वातोपरी तयारी केली असून निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या स्कॉड व वेगवेगळया टिमचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी आज घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात आज अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा सार्वत्रिक निवडणुक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वच टिम व अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.आतापर्यंत झालेलया कामाची माहिती जाणुन घेत त्यात राहीलेल्या त्रुटीची तातडीने पुर्तता करण्याची कार्यवाही श्री.जगदाळे यांनी संबंधित स्कार्ड व टीमांना दिल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) धनजंय निकम,उपजिल्हा निवडणुक अधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी (ससप्र)जयसिंग वळवी, उपस्थित होते.अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या विविध टिमचा आढावा घेतला त्यात उपलब्ध मनुष्यबळ, ई.व्हि.एम व्हि.व्हि पॅट, टास्कफोर्स,ट्रेनिंग मॅनेजमेंट,उपलब्ध साधन सामुग्री,खर्च,कायदा व सुव्यवस्था,बॅलेट पेपर एस.एम.एस,पोस्टल बॅलेट स्टॉगरुम,सायबर सेक्युरीटी,दिव्यांग मतदारांची व्यवस्था, वाहन व्यवस्था मतदान केद्रावर पिण्याचे पाणी, इलेक्ट्रीसिटी,शैाचालय, मोबाईल रेंजसाठी,रनर, नियुक्त झोनल ऑफिर्स, ट्रान्सपोर्ट,प्लॅन,कर्मचारी डाटा माहिती,मतदान केंद्रे,प्लॉईंग स्कॉड, सि-व्हिजील,सुगम, सुविधा समाधान, गोडावुन व्यवस्था स्वीप कार्यक्रम,मिडीया सेंटर, इत्यादी निवडणूक कामात सहभागी झालेल्यांचा सविस्तर आढावा घेतला.

श्री.जगदाळे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेलया प्रत्येक टिमने आपले काम जबाबदारीने करावयाची असून सर्व कार्यरत टिमांनी एकमेकांशी संवाद साधुन आपले काम व्यवस्थित करावेत ते पुढे म्हणाले की जिल्हाधिकारींच्या अधिपत्याखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.तसेच मतदार संघात भरारी पथके व अन्य पथके नेमण्यात आली आहेत.निवडणुकीसाठी सि-व्हिजिल ॲप वापरण्यात येणार असुन या ॲपद्वारे सामान्य नागरीक तक्रार करु शकतील व तक्रार दारास 100 मिनिटात त्यांचे तक्रारीचे निराकरण करण्यात येणार असलयाचेही त्यांनी यावेळी सांगितले