अभाविप आयोजित मतदान जनजागृती अभियाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार सुरुवात

725

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा नंदूरबारच्या वतीने काल आगामी लोकसभा निवडणुकीमधे शंभर टक्के मतदान होण्यासाठी मतदान जनजागृती रथ यात्रेची सुरुवात झाली असून हि रथ यात्रा आज दिनांक १३ मार्च २०१९ रोजी शहादा शहरात येऊन पोहोचली आहे.१००% मतदान होण्यासाठी विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका आहे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी १००% मतदान हि काळाची गरज आहे व विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविद्यालय विद्यार्थी व नागरिक यांच्यात मतदान जनजागृती करण्यासाठी आयोजित हे अभियान महत्त्व पूर्ण उपक्रम आहे असे मत यावेळेस उपस्थित परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले, यावेळी जिल्हा सहसंयोजक निलेश हिरे, तालुका प्रमुख प्रितम निकम शहरमंत्री स्वप्नील जैन व नंदुरबार शहरसंघटन मंत्री प्रमोद बेळंकी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे,से नो टू प्रेस नोटा,नेशन्स फर्स्ट वोटिंग मोस्ट,माझं मत सामाजिक समरसतेसाठी, लोकशाहीला बळकट करण्यासाठी,महिलांच्या सुरक्षेसाठी,महिला सन्मानासाठी,सैनिकांच्या समर्थनासाठी,भ्रष्टाचार संपवण्यासाठी,संशोधन वाढवण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी असे मतदार बंधु,भगिनी व विद्यार्थ्यांना आवाहन अभाविप कडून करण्यात येत आहे या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या स्मारकास अभिवादन करून या अभियानाला सुरवात करण्यात आली त्या नंतर शहादा बस स्थानका,जनता चौक,चावडी चौक,
शिवाजी चौक,विश्रामकाक शैक्षणिक संकुल,नाईक महाविद्यालय शहादा,पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचा क.वि.वा.महाविद्यालय,फार्मसीमहाविद्यालय,अभियांत्रिकी महाविद्यालय,ऍग्री महाविद्यालयशहादा,औद्योगिक प्रशिक्षण संस्था शहादा,शासकीय वसतिगृह1,2 मुलांचे,शासकीय वसतिगृह 1,2 ,3 मुलींचे येथे अभियान राबविण्यात आले ही यात्रा १२ ते १६ मार्च दरम्यान तळोदा, अक्कलकुवा,खापर, मोलगी,धडगाव,लोणखेडा,शहादा,नवापूर व नंदुरबार येथे रथयात्रेच समारोप होणार आहे.
ही यात्रा ५ दिवस ६ तालुके अशी योजली आहे.या यात्रेत एक चार चाकी असेल,शक्य तेवढे महाविद्यालय व चौका चौकात मतदान जनजागृती पत्रक वाटून करण्यात येणार आहे.