शिक्षकेकडून लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकास अटक

1209

शैलेंद्र चौधरी,नंदुरबार

शालेय वार्षीक तपासणी शेरेबुकात त्रुटी ना काढाव्यात म्हणून शिक्षिकेकडून  500 रुपयांची लाच मागणाऱ्या  मुख्याध्यापक मोरसिंग राठोड यांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा डामरखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक मोरसिंग राठोड याने त्रुटी न काढता चांगला शेरा मारण्यासाठी 500 रु लाच स्वीकारताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अधिकारी शिरीष जाधव यांनी पोलीस निरीक्षक संगीत एस पाटील याबाबत सविस्तर माहिती मिळाली की तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असून त्याची पत्नी डामरखेडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत तरी त्याच्या शाळेची वार्षिक तपासनी शेरेबुकात कोणत्याही प्रकारची त्रुटी न काढता शेरा मारून द्यावा यासाठी मोरसिंग राठोड याने सदर महिला शिक्षिकेकडे 500 रु लाच मागितली सदर शिक्षिकेने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली व त्यानुसार विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव व पोलीस निरीक्षक संगीता एस पातील यांनी नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर समोरील रसवंती गृहाजवळ सापळा रचून आरोपी मोरसिंग राठोड यास शीताफीने लाच स्वीकारताना त्यास अटक करण्यात आले त्यामुळे पुन्हा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा भ्रष्ट्राचार बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे वा आज दिवसभर जिल्हा परिषदेच्या आवरात व सर्वसामान्य जनसामन्यात एकच खळबळ माजली आहे.