कुंकू टिकली आणि टॅटू’ फेम रमा उर्फ भाग्यश्री करणार प्रेमात कल्ला

967

अनिल चौधरी,पुणे

बस बुलेटवर’ या रोमँटिक सॉंगमध्ये पहा ‘स्त्रीलिंग पुल्लिंग वेबसिरीज फेम भाग्यश्रीच्या अदांचा चस्का अचूक शब्दांची किमया, ठेका धरायला लावणार संगीत, कलाकारांची भारी अदाकारी, सेट्स, कोरिओग्राफी या साऱ्यांची योग्य प्रमाणात सांगड घालणाऱ्यांत आघाडीचं नावं घेता येईल ते म्हणजे चेतन गरुड प्रोडक्शन्सचं. सिंगल म्युझिक अल्बम्सच्या गणितातला हुकमी एक्का म्हणून गणल्या जाणाऱ्या चेतन गरुडाची ही गरुडझेप वाखाणण्याजोगी आहे. ‘खंडेराया झाली माझी दैना’, ‘सुरमई’, ‘आली फुलवली’ आणि आत्ता ‘बस बुलेटवर’ ह्या आगामी रोमॅंटिक सॉंगने मराठी म्युझिक इंडस्ट्रीत चेतन गरुड प्रोडक्शन्सने यशस्वी चौकारच मारला आहे. तरुणांच्या मनातले भाव बिनधास्तपणे गाण्याच्या स्वरूपात मांडल्यामुळे हे गाणं गल्ली-नाका व्हाया कॉलेज कट्ट्यावर ऐकू येईल यात दुमत नाही. हे मस्तीभर गाणं लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे पण त्यापूर्वी त्याचा टिझर तुम्ही ‘वाजवा मराठी’ या युट्युब चॅनेलवर पाहू शकता. विशेष म्हणजे या गाण्यात ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ फेम आणि ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ या गाजलेल्या वेबसिरीजमधील भाग्यश्री आपल्या मस्तीभऱ्या अंदाजात थिरकताना दिसणार आहे.

चेतन गरुड आणि एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्ट यांच्या संयुक्तविद्यमाने ‘बस बुलेटवर… मला आवळून धर… घालूया प्रेमात कल्ला’ असे गमतीशीर शब्द असणाऱ्या या गाण्याची जादू तरुणाईला वेडावून सोडेल अशीच आहे. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या प्रेमातला कल्ला सांगणारे हे गीत लिहिले आहे अक्षय कर्डक यांनी तर त्याला साजेसं तडकभडक संगीत लाभलंय अतुल भालचंद्र जोशी-सिद्धेश कुलकर्णी या द्वयींचं. विशेष म्हणजे गायक केवल जयवंत वाळंज यांनी आपल्या मस्तीभऱ्या गायकीने या गाण्यात खासच रंग भरलेत. तर बॉयफ्रें-गर्लफ्रेंडच्या भूमिकेत झळकणारे डॅक्स मॅथ्यू आणि भाग्यश्री एनएच यांनी ‘बस बुलेटवर’ गाण्यात एकच कल्ला उडवून दिलाय. या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे तेजस पाटील यांनी तर संकलन राहुल झेंडे यांनी केलं आहे. शिवाय प्रेमाची बार उडवून लावणाऱ्या या गाण्याची दिलखेचक सिनेमॅटोग्राफी रवी उच्चे यांनी केली आहे. डॅक्स मॅथ्यू यांचं नृत्य-दिगदर्शन आहे .’बस बुलेटवर’ या गाण्याची एक छोटीसी झलक तुम्ही तुमच्या मोबाईल कॉलरट्यूनवरही लावू शकता. वोडाफोन आणि बीएसएनएल ग्राहकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा.

प्रेयसीला आपल्या मनीचे भाव ऐकवण्यासाठी ‘बस बुलेटवर’ हे गाणं नक्की ऐकवा आणि करा प्रेमाचा कल्ला.