लोकसहभागातून जलसंवर्धनाची चळवळ उभी करा; मंजुळे

761

शैलेंद्र चौधरी,नंदुरबार

शासन, प्रशासन,स्वयंसेवी संस्था आणीलोकसहभागातून वाया जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब जमीनीतअडविण्यासाठी जलसंवर्धनाची चळवळ उभी करन जिल्ह्याची भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले.
जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीतर्फे 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीत आयोिजत जलजागृती सप्ताहाचे शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मध्यम प्रकल्पचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जोशी, रोहयोचेउपजिल्हाधिकारी डॉ सुरेश कोळी,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संदीप माळोदे, जि.प.उप मुख्यकार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, तहिसलदार भाऊसाहेब थोरात,गटविकास अधिकारी अशोक पटाईत,उपअिभयंता एस.जी. पाटील,किशोर नाईक,किशोर पावरा उपस्थित होते.बालाजी मंजुळे म्हणाले,जनतेला पाण्याचे महत्वपटवून देण्यासाठी जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन व विविध सेवाभावी संस्था मोठया प्रमाणात कार्यरत आहेत.जिल्ह्यात तापी, नर्मदा,रंगावली,शिवण सारख्या मोठया नद्या असताना नियोजनातील त्रुटिंमुळे आणि पाण्याच्या अतिवापरामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.हे टाळण्यासाठी जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून जनतेला जलसाक्षरतेचे महत्व पटवून द्यावे,असे आवाहन त्यानी केले.ते म्हणाले,जनतेला पाण्याचे महत्व पटले असून नागिरक पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसाक्षरता उपक्रमात सहभागी होतील, यामाध्यमातून जिल्ह्यात पाण्याची मोठी चळवळ उभी राहू शकेल.2020 पर्यत जिल्ह्यात पाण्याला प्राधान्य देवून जलक्रांती निर्माण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील जनतेला पिण्याचे पाणी व शेतीसाठी बारामाही पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सूक्ष्म नियोजन करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.यावेळी जिल्हाधिकार्यानी उपस्थितांना जलसाक्षरतेबाबत शपथ दिली.जलसंपदा व नगरपािलकांनी जलसाक्षरता विषयक माहीतीपट ग्रामीण भागात दाखवून जलसाक्षरतेचे महत्व पटवून द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
प्रस्ताविकात जोशी म्हणाले,नंदुरबार जिल्ह्यात नैसर्गिक पाणी स्थिर असून तापी खोऱ्यात पाण्याचा मुबलक साठा असला तरी पाण्याचा वापर वाढला आहे.पाण्याचा वापरासाठी शेतकऱ्यांमध्ये जलजागृतीसाठी ठिबक सिंचनाचा मोठया प्रमाणात वापर करण्याची गरज आहे.यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा,तापी,शिवण, रंगावली,गोमाई,बुराई, देहली,नागन,उदई,नेसु नद्यातुन आणलेल्या पाण्याने भरलेल्या जलकुंभाची विधीवत पुजा करण्यात आली.जलजागृती साप्ताहानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातून जलसाक्षरता दिंडीचे आयोजन करण्यातआले.जिल्हाधिकारी मंजुळे स्वत:पालखी खांद्यावर घेवून दिंडीत सहभागी झाले.