मातृभूमीवर प्रेम करणारे नेहमीच एकमेकांच्या सोबत राहतात: मुख्यमंत्री

948

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

भाजपा आणि शिवसेना एकमेकांना बोलले, पण मनाने आपण कधीच वेगळे झाले नव्हतो. सत्तेसाठी हे दोन पक्ष कधीच एकत्र आले नाही. मातृभूमीवर प्रेम करणारे नेहमीच एकमेकांच्या सोबत राहतात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असे विधान त्यांनी सेना-भाजप युतीचा औरंगाबाद येथे पार पडलेल्या महामेळाव्यात केले.
मराठवाड्यातील ८ ही जागा भाजपा-शिवसेनेच्याच निवडून येतील, यात अजिबात शंका नाही असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही, इतकी मदत युतीच्या सरकारने दिली.
पवार साहेब म्हणतात, ७०,००० कोटींची कर्जमाफी केली, पण ते हे सांगत नाही की, महाराष्ट्रात केवळ ४००० कोटी रुपये फक्त दिले,१५ वर्षात त्यांनी फक्त एकदा दिले, तर डांगोरा पिटतात.पण आता तर दरवर्षी ७०,००० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे.औरंगाबादच्या समांतर पाणी पुरवठ्याच्या योजनेचा प्रश्न केवळ युतीचे सरकारच सोडवू शकते.जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाच्या सुविधा निर्माण होत आहेत. देशभक्तीने ओतप्रोत सरकार पुन्हानिवडण्याची जबाबदारी आपली आहे हा नवा भारत आहे.आपली ताकद दाखविणारा हा भारत आहे.शत्रुची वाकडी नजर ठेचणारा हा भारत आहे, मी काही बोलणार नाही.हा देश देशप्रेमींच्या सोबतच राहणार आहे. २४ तारखेला कोल्हापूर येथे महायुतीचे सर्व सहयोगी उपस्थित असतील.काळजी करू नका.तुम्ही कितीही काडी केली,तरी सगळे सोबत राहणार आहेत असेही विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे,भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे,अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.