महाड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार तयारी

758

जुनेद तांबोळी, महाड
रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2019 चे उमेदवार सुनील तटकरे यांचा नाव पुढे आले आहे त्यासाठी महाड मध्ये सिनेअभिनेते व संभाजी स्वराज्य रक्षक या मालिकेतुन घराघरात पोहचलेले डाॅ अमोल कोल्हे हे  सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी महाड मध्ये येत असुन . महाड च्या चांदे क्रिडांगण येथे राष्ट्रवादी ची आघाडीची सभा सायंकाळी 6 वाजता ही सभा आयोजित केली आहे
राष्ट्रवादीचे शिरूर मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, रायगडचे उमेदवार सुनील तटकरे,माजी प्रदेशाध्यक्ष रा.काँग्रेस.पक्ष. भास्कर जाधव, रायगड जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप, शेकाप चे नेते जयंत पाटील, आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्या ते आधी किल्ले रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच चवदार तळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन करून ह्या सभेस सुरवात होईल. सभेस सादारण 15 ते 20 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असा ठाम विश्वास आयोजकांना वाटत आहे.