क्रीडा क्षेत्रातील तेजस्विनींचा सुरेख संगम

802

अनिल चौधरी,पुणे

दुर्दम्य आशावाद,प्रचंड मेहनत ,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या सकारात्मक बळावर ज्यांनी केवळ सांस्कृतिक राजधानीचेच अर्थात पुण्यनगरीचेच नांव मोठे केले नाही ;तर अवघ्या महाराष्ट्रालाही त्यामुळे झळाळी लाभली आहे.
धावण्याच्या स्पर्धेत अल्पवयात व अल्पावधीत ज्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली आहे ;त्या दोन्हीही धावपटू पुण्याजवळील वडगांवशेरीतीलच आहेत हा कर्मधर्मसंयोगच आहे.संपदा बुचडे व अवंतिका नरळे या त्या तेजस्विनी!
हाँगकाँग येथे झालेल्या युवा आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत पुणे,वडगांवशेरीतील राष्ट्रीय खेळाडू अवंतिका नरळे हिने १०० मी.मध्ये सुवर्ण पदक मिळवून आशियाई तील सर्वात वेगवान धावपटू म्हणून यश संपादन केल्याबद्दल तिची जीवलग सहकारी राष्ट्रीय खेळाडू ,आंतरराष्ट्रीय मॕरेथाॕन भारतीय गटात विजेती संपदा बुचडे हिने पेढा भरविला.शाल,पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले.
या छोटेखानी आनंदी सोहळ्यास अवंतिकाचे आई-वडील,ज्येष्ठ पत्रकार एकनाथ लंघे,माजी स्वीकृत नगरसेवक मुकुंद गलांडे,राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे,संग्राम प्रतिष्ठानचे सहसचिव जयवंत माळी व उपस्थितांनी भविष्यात आॕलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या.