पनवेलमध्ये अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाने खळबळ

2339

गिरीश भोपी पनवेल

पनवेलमध्ये एएसी कॉलेज परिसरात आज सकाळी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे. राष्ट्रीय महामार्ग – 4ब च्या उड्डाणपुलाखाली हा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एएस कॉलेज परिसरात  खळबळ उडाली होती.

घटनास्थळी घटना कळताच पोलिसांचे पथक पोचले आणि मृतदेह तात्काळ रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे. डोक्यात दगड घातल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी यासंदर्भात तपास करीत आहेत.