लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

1426

अनिल चौधरी, पुणे

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महेश गपाट, रा. मुंजोबा कॉलनी शेजारी , चिंचवडेनगर पुणे याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात १३९/२०१९, स्त्री अत्याचार भां.द.वि ३६६,३७६(२)आय, ३७६(२) एन, पोक्सो कायदा ३,४,५(ज), (२) ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक शेवाळे म्हणाले कि, आरोपी महेश गपाटे याने चिंचवड परिसरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्यामुळे त्याच्या विरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार पोस्को तसेच इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.