पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार यांना विशेष सेवा पदक जाहीर

871

गिरीश भोपी, प्रतिनिधी पनवेल

नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी 

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या नक्षलग्रस्त भागामध्ये विशेष कामगिरी बजावल्याबद्दल विशेष सेवा पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयअंतर्गत परिमंडळ 2 मधील पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र लिंबाजी बेलदार यांनाही हे पदक जाहीर झाल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये बेलदार यांच्यावर पोलिसांकडून त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, पत्रकार व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरीबद्दल शासनाच्या गृहविभागातर्फे सदरचे पदक जाहीर करण्यात येतात. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा परिसर राज्यातील नक्षलीग्रस्त आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांना या परिसरात सेवा बजाविण्यासाठी ही पदके जाहीर केली जातात. शासनाने पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी विशेष सेवा पदके राज्यातील अनेक पोलिसांना जाहीर केले आहे. यामध्ये नक्षलग्रस्त भागांतील खडतर परिस्थितीमधे उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्ह्णून कार्यरत असणारे नरेंद्र लिंबाजी बेलदार यांना महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार यांची 2013 मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यानंतर बेलदार यांची पहिली पोस्टिंग गडचिरोली येथील छत्तीसगड व तेलंगणा सीमाला लागूनच असलेल्या झिंगानूर पोलीस ठाण्यामध्ये झाली. या पोलीस ठाण्यामध्ये स्पेशल फोर्समध्ये (QRT) च्या प्रमुख म्हणून बेलदार यांनी काम पाहिले आहे. 3 वर्ष 5 महिने नक्षलग्रस्त गडचिरोली भागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केले आहे. या दरम्यान त्यांनी नक्षलविरोधी अभियानांचे नेतृत्व केले. यामध्ये आंतरराज्य अभियांनाचा समावेश होता. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या अनेक चकमकीमध्ये बेलदार सहभागी होते. त्यांनी लक्षलवादी भागातील अनेक जहाल नक्षलवाद्यांचे मनपरिवर्तन करून त्यांचे आत्मसमर्पण घडवून आणले. गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद नष्ट व्हावा. त्याचबरोबर आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या मनावरील रागीट असलेल्या संस्कार दूर करून त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्यासाठी बेलदार यांनी विशेष प्रयत्न केले. नक्षलग्रस्त गडचिरोली, छत्तीसगड मध्ये अश्या प्रकारे विविध चांगल्या या बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे नरेंद्र बेलदार यांना महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. त्याचबरोबर बेलदार यांना पोलीस सेवेतील हे दुसरे विशेष सेवा पदक असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय आणि पत्रकारांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.