जिल्हादंडाधिका-यांचा प्रतिबंधात्मक आदेश

709

मल्हार  न्यूज प्रतिनिधी,

पुणे जिल्ह्यातील लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणांत  सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने नवल किशोर रामजिल्हादंडाधिकारी पुणे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड1973 चे कलम 144  शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17 (3) (अे (बीमधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण  जिल्ह्यात दि. 27 मे 2019 अखेरपर्यंत स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे/हत्यारे दारुगोळा बाळगणेस  बरोबर नेणेस मनाई केली आहेया आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बॅंका  सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमणेत आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांनावगळण्यात आले आहेबँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाहीयाची दक्षता घेणेची जबाबदारी संबंधित बँकेची/संस्थांची अधिकाऱ्यांवर राहिल.                                             सदरचा आदेश दि.27 मे 2019 चे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहीलया आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.संहिता कलम 188 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहीलअसे जिल्हादंडाधिकारी पुणे यांनीप्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

 

34-पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सौरभ के.तिवारी खर्च निरीक्षक 

       34-पुणे लोकसभा मतदार संघासाठी सौरभ के.तिवारी यांची निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.सौरभ के.तिवारी यांचे पुणे येथे आगमन झाले असून व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस (हरीत इमारत) कक्ष क्रमांक ए-202 येथे त्यांचे वास्तव्य राहणार आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8275969500 असा असून expobs2019pune34@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे. त्यांना शनिवार व रविवार, या दिवशी सकाळी 11 ते 12 या कालावधीत भेटता येईल असे, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

35-बारामती लोकसभा मतदारसंघासाठी रोहित राज गुप्ता खर्च निरीक्षक

  35-बारामती लोकसभा मतदार संघासाठी रोहित राज गुप्ता यांची निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. रोहित राज गुप्ता यांचे पुणे येथे आगमन झाले असून व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस (हरीत इमारत) कक्ष क्रमांक ए-203 येथे त्यांचे वास्तव्य राहणार आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8275969501 असा असून expobs2019baramati35@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे. त्यांना शनिवार व रविवार, या दिवशी सकाळी 11 ते 12 या कालावधीत भेटता येईल, असे अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.