न्यायालयाने आमदार टिळेकर यांना दिला दिलासा; वसंत मोरेनां येवलेवाडी विकास आराखड्यावर वक्तव्य न करण्याचे आदेश

701

भूषण गरुड

मनसेचे नगरसेवक वसंत मोरेनी येवलेवाडीचा विकास आराखड्यात आरक्षण बदलासाठी आमदार योगेश टिळेकरांनी एका बिल्डरकडून आलिशान गाडी घेतल्याचा आरोप सोशल मीडिया व इतर माध्यमातून केला होता. याप्रकरणी आमदार योगेश टिळेकर यांनी पुणे दिवाणी न्यायालयात वसंत मोरे यांच्याविरुद्ध 10 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा व मानहानीचा दावा दाखल केला होता. याबाबत पुणे दिवाणी न्यायालयाने वसंत मोरेंना वक्तव्य न करण्याचे आदेश दिले.

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केलेले वक्तव्य हे कुठलीही सत्यता पडताळून न पाहता. केवळ राजकीय हेतूने कुठल्याही कागदपत्राविना केले होते. येवलेवाडीच्या विकास आराखडा समितीमध्ये आमदार योगेश टिळेकरांच्या आई रंजना टिळेकर यांची नेमणूक पुणे महानगरपालिका मुख्यसभेत झाली होती. या नेमणुकीत व येवलेवाडी विकास आराखड्यात आरक्षण बदलीसाठी आमदार योगेश टिळेकरांचा कोणताही संबंध नाही. याप्रकरणात आमदार टिळेकरांच्या आई रंजना टिळेकर यांचा येवलेवाडी विकास आरक्षण बदलाचा कुठलाही संबंध असल्याचा एकही पुरावा मनसेचे नगरसेवक वसंत मोरे पुणे दिवाणी न्यायालयात दाखल करू शकले नाहीत. या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे किंवा त्यांच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीने येवलेवाडी विकास आराखडा व आलीशानगाडी संदर्भात आमदार टिळेकर यांच्या बदनामी बाबत कोणतीही निवेदन अथवा वक्तव्य कोणत्याही माध्यमांद्वारे प्रसिद्ध करू नये. असा मनाईचा आदेश न्यायालयाने दिला आहे.