बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणार

959

गिरीश भोपी,पनवेल

 पनवेल महानगर पालिका हद्दीतील वडाळे तलाव सुशोभीकरण करण्याचे काम सुरु झाले असून याठिकाणी काम करीत असताना ठेकेदाराने पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न काढता बेकायदेशीरपणे वृक्ष तोड केली असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी तलावाच्या सुशोभीकरणासाठी सभोवताली संरक्षण भिंत बांधण्यासाठी ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणला आहे मात्र यावेळी ठेकेदाराने याठिकाणी असणाऱ्या झाडांची कत्तल केली आहे. याबाबत पनवेल महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत अधिक माहिती घेऊन लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत म्हणजेच महानगरपालिका क्षेत्रातील खासगी जागेतील अथवा सार्वजनिक जागेतील झाडांची तोड करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र येथील काम करीत असताना ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता एवढे मोठे झाड तोडले असल्याने पनवेल महानगर पालिका प्रशासन याबाबत काय कारवाई करणार ? हे पाहणे उचित ठरेल. क्षय कमी करण्यासाठी आणि हवामानाचे प्रमाण कमी करण्यासाठी झाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते वातावरणातून कार्बन डाय ऑक्साईड खेचून घेतात आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वायू ते बाहेर सोडत असतात. झाडे आणि वनस्पती अनेक प्रजाती व वनस्पतींसाठी एक निवासस्थान देतात. उष्ण कटिबंधीय रेनफॉरेस्ट जगातील सर्वात जैवविविध वास्तूंपैकी एक आहेत. झाडे सावली आणि आश्रय देण्याबरोबरच इतर अनेक उपयोग पुरवितात. त्यांच्या दीर्घ आयुष्यामुळे आणि उपयुक्ततेमुळे, वृक्षांना नेहमीच आदरणीय मानले जाते, विविध संस्कृतींमधील पवित्र ग्रहाबरोबर ते जगातील अनेक पौराणिक गोष्टींमध्ये एक भूमिका बजावतात. जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक जंगले तोडली जात आहेत. ज्यांचे गंभीर परिणाम जाणवायला लागले आहेत. आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही. ज्या प्रमाणात तोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा र्‍हास होत आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. दगडांच्या खाणींमुळे डोंगरमाथेही उजाड होत आहेत अन् जवळच्या भागातील पर्जन्यमान कमी होत आहे. ‘एक वृक्ष तोडल्याने १७ लाख रुपयांचा तोटा होतो. पनवेल तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी झाडांची कत्तल स्वतःच्या फायद्यासाठी केली जात आहे.
यावेळी पनवेल महानगरपालिका हद्दीत वृक्षतोड होत असतानाचे प्रकार पालिका अधिकाऱ्यांच्या समोर आणल्यानंतर पालिका अधिकारी मात्र बेकायदेशीर वृक्ष तोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यापेक्षा त्यांची पाठराखण करतानाच अधिक प्रमाणात दिसून येतात. याबाबत माहिती दिल्यानंतर त्याचे इतर माहितीसाठी संपर्क साधल्यांनंतर मात्र उपायुक्त असणारे अधिकारी याबाबत अधिक बोलण्यास टाळाटाळ करीत असल्याचे जाणवते. त्यामुळे वृक्ष तोडीसारख्या गंभीर बाबी पालिका अधिकारी पाठीशी घालण्याचे नेमके कारण ते काय ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. विनापरवानगी झाडांची कत्तल करणे हा गुन्हा असून त्यांच्यावर महाराष्ट्र दंड विधान अनुसार त्यांच्यावर जंगल कायदा कलम नुसार देखील कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यावेळी वडाळे तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुरु असलेल्या कामठी बेकायदेशीरपणे वृक्ष तोड केली जात असल्यामुळे सदर माहितीबाबत अखेर सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क करण्याची वेळ आली आहे. कारण वरिष्ठ अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्याचे यापूर्वी समोर आल्यामुळे त्यांच्या इतर अधिकाऱ्यांनाही त्याचा प्रत्यय येणे गरजेचे असल्याचेच यामधून गरजेचे आहे.