लोकसभा निवडणूक 2019 जिल्ह्यात 25 सहाय्यकारी मतदान केंद्रांना मंजुरी

583

शैलेंद्र चौधरी नंदूरबार

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 25 सहाय्यकारी मतदानकेंद्रांना मंजूरी दिली आहे.
मतदारांची संख्या 1400 पेक्षा जास्त असलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्र राहणार आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील एकाही ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्र नाही. शहादा विधानसभा मतदारसंघातील 13, नंदुरबार 6 आणि नवापूर विधानसभा मतदारसंघातील 6 मतदान केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
शहादा विधानसभा मतदारसंघ : 02-कोटबांधणी (नागझिरी),116-लंगडी, 160मोहिदे तश, 172-शहादा, 173-शहादा, 175-शहादा, 176-शहादा, 187-शहादा, 195-शहादा, 204-वाल्हेरी, 281-तळोदा, 285-तळोदा, 289-तळोदा.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ: 267-नंदुरबार, 271-नंदुरबार, 272-नंदुरबार, 325-नंदुरबार, 356-नंदुरबार, 360-नंदुरबार.
नवापुर विधानसभा मतदारसंघात 86-कोकणीपाडा (निमगाव),187-नवापुर, 188-नवापुर, 193-नवापुर, 194-नवापुर, 197-नवापुर या सहाय्यकारी मतदान केंद्रांना मंजूरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिली आहे.