कोंढव्यातील बिल्डिंगच्या कॉलमला क्रॅक

2335

मल्हार न्यूज प्रतिनिधी

कोंढवा खुर्द मधील संत ज्ञानेश्वर नगर मधील लेन नंबर 3 मधील शबाना मंजिल या पाच मजली इमारतीचा एका कॉलम ला क्रॅक (तडा) गेला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना मंजिल ही इमारत गेली वर्षाभरापूर्वी बांधण्यात आली होती.सहा महिन्यांपासून येथे नागरिक राहत आहेत. यामध्ये 16 फ्लॅट असून जवळपास 80 लोक या इमारतीत राहत आहेत. आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोठा आवाज होऊन या इमारतीच्या एका कॉलमला मोठ्या प्रमाणात तडा गेला. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन बाहेर आले.नागरिकांनी त्वरित अग्निशमनला कळविले.अग्निशमनच्या कर्मचारी आणि पोलिसांनी इमारतीच्या आतील नागरिकांना त्वरित बाहेर काढून आजू बाजूच्या घरातील तसेच इमारतीतील नागरिकांना देखील बाहेर काढून परिसर रिकामा केला. याचा आवाज 200 मीटर परिसरात गेल्याने नागरिकांनी भयभीत होऊन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


यावेळी पुणे महानगर पालिकेच्या कार्यकारी अभियंता नामदेव गम्बीरे यांनीं या इमारतीची पाहणी केली असता प्रथम दर्शनी इमारत धोकादायक आहे किंवा कसे याबाबत उद्या पालिकेच्या वतीने इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतरच सांगितले जाईल असे ते म्हणाले.
याप्रसंगी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पवार म्हणाले की, कोंढवा परिसरातील मोठ्या प्रमाणात बांधकामे झाले असून सर्वच इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट झाले पाहिजे आणि दोषी असलेल्या धोकादायक इमारतीवर त्वरित कारवाई होऊन त्या जमीनदोस्त केल्या पाहिजेत.
तर एका स्थानिक नागरिकाने नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले की, येथील राजकीय पुढारी आणि छोटे मोठे बिल्डर्स यांची 20 ते 30% ची भागीदारी आहे , त्यामुळे कुठल्याच अनाधिकृत इमारतीवर कारवाई होत नाही.
याप्रसंगी नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेवक भरत चौधरी, हाजी फिरोज यांनी याठिकाणी भेट दिली.