इमारतीच्या कॉलमला तडा प्रकरणी ; महापालिकेने धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश

1003

भूषण गरुड

कोंढवा खुर्द, सर्वे नंबर 45, ज्ञानेश्वर नगर, गल्ली नंबर 3 मधील शबाना मंजिल या इमारतीच्या मुख्य कॉलमला मोठा आवाज होऊन तडा गेल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. इमारत 5 मजल्याची असून या इमारतीत 16 सदनिका आहेत. कोंढवा पोलीस व अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी त्वरित रवाना होऊन. सुरक्षिततेच्या दृष्टीने शबाना मंजिल इमारतीमधील 80 रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढून इमारत पूर्णपणे रिकामी केली. अनधिकृत इमारत धोकादायक स्थितीत असल्याने महापालिकेने तात्काळ कारवाई करत इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश देत तसेच संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

 

कोंढवा खुर्द मध्ये सोमवार दि.1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 सुमारास सर्वे नंबर 45, ज्ञानेश्वर नगर, गल्ली नंबर 3 मध्ये 2 गुंठ्याच्या 5 मजली इमारती मधील दर्शनी मुख्य कॉलमला तडा गेल्याने इमारतीला हादरा बसल्याने इमारतीमधील रहिवासी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर इमारत अल्फा डेव्हलपर्स ची असून त्याचे मालक इरफान शेख आहे. या घटनेची माहिती ती मिळताच कोंढवा पोलीस व कोंढवा अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी रवाना होऊन सदनिका मधून 80 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढत इमारत पूर्णपणे रिकामी केली. घटनास्थळी महानगरपालिकेचे कनिष्ठ अधिकारी नामदेव गव्हाणे यांनी पाहणी करताच सदर इमारत ही अनधिकृत समोर येताच. महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करत धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. याबाबत महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले की हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात बिल्डर अल्फा डेव्हलपर्स त्याचे मालक इम्रान शेख यांना अनधिकृत इमारत जमीन दोस्त करण्याचे नोटीस देण्यात आले व इमारतीमधील सर्व रहिवाशांना सामानासह इमारत खाली करण्यासाठी नोटीसा दिल्या. तसेच संबंधित घटकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

कोंढवा खुर्द मधील मिठानगर, भाग्योदय नगर, शिवनेरी नगर हा भाग डोंगर उतार सदृश्य असून संवेदनशील व दाट वस्तीचा आहे. या भागात पूर्वीपासून दाट लोकवस्ती आहे व रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीस मोठ्या समस्या आहेत. या ठिकाणी छोट्या गल्ल्यानमुळे अर्धा गुंठा, एक गुंठा प्लॉटवर पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असल्याने व पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने सर्व प्रकारची वाहने गल्ल्यांमध्ये उभी करण्यात येत असतात. महापालिकेची अनधिकृत बांधकामे पाडण्याची यंत्रणा पोहोचत नसल्याने कारवाई करताना आजूबाजूच्या बांधकामांना धोका होत असतो. त्यामुळे पूर्ण इमारत जमीनदोस्त करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत उपलब्ध तांत्रिक यंत्रणेने फक्त भिंती पाडणे व स्लॅबला होल पाडून, कटरच्या सहाय्याने तुकडे करण्या पलीकडे काही करता येत नाही. अशा ठिकाणी नागरिक पुन्हा बांधकामे करीत असल्याने महानगरपालिकेकडे कारवाईबाबत तक्रारी प्राप्त होतात असतात. महानगरपालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्या सोबत काही ठिकाणी संबंधित मिळकत धारकांवर गुन्हेही दाखल केले आहेत. गुन्हेगारांना जामीन मिळत असल्याने ते पुन्हा अशी बांधकामे सुरू करतात. मनपा अभियंता कर्मचाऱ्यां कडून गुन्हे नोंदविले जात असल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. अंतर्गत रस्ते कमी रुंदीचे असल्यामुळे व संवेदनशील असल्यामुळे रस्ते बंद केल्याशिवाय कारवाई होऊ शकत नाही. या ठिकाणे यापूर्वी खात्यामार्फत अनेक वेळा कारवाई करण्यात आल्या आहेत.