जागेच्या व्यवहारास नकार दिल्याने तरुणावर धारदार शस्त्राने वार

701

भूूूषण गरूड

बिबवेवाडीत खामकर वस्ती, सरगम चाळ, ठोंबरे मिल शेजारी येथे सोमवार दि.1 एप्रिल रोजी जागेच्या कागदपत्राच्या व्यवहारास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून धारदार शस्त्राने तरुणावर वार करून केले जखमी. या घटने प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर गुन्ह्याच्या तपास करत असताना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पळून जात असताना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना केली अटक.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि.1 एप्रिल 2019 रोजी दुपारी 4.00 सुमारास बिबवेवाडीत खामकर वस्ती, सरगमचाळ, ठोंबरे मिल शेजारी येथे जागेच्या कागदपत्राच्या व्यवहारास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून आरोपी प्रमोद सकट व आरोपी संदीप म्हस्के(रा.खामकर वस्ती,बिबवेवाडी) यांनी धारदार शस्त्राने फिर्यादी अरविंद दत्तू कांबळे उर्फ डॅडी(रा.सरगमचाळ,बिबवेवाडी) यास वार करून जखमी केले. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी संदीप म्हस्के यास घटनेच्या दिवशी पळून जात असताना केली अटक. मंगळवार दि.2 एप्रिल 2019 रोजी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गुजर व पोलीस शिपाई कोठावळे यांना त्यांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रमोद सकट हा मुंबई येथे पळून जाणार असून तो त्याच्या पत्नी व मुलीला भेटण्यासाठी मार्केटयार्ड येथील बसडेपो मध्ये येणार आहे. याची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण आडके, पोलीस हवालदार रवी चिप्पा, पोलीस शिपाई गुजर, पोलीस शिपाई कोठावळे यांनी सापळा रचून आरोपी प्रमोद सकट यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण आडके करीत आहेत.

सदर कामगिरी बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण आडके, पोलीस हवालदार रवी चिप्पा, पोलीस शिपाई गुजर, पोलीस शिपाई कोठावळे यांनी केली.