लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध परवान्यांसाठी एक खिडकी योजना

644

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजीय पक्ष किंवा उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक विविध परवानग्या आणि परवान्यांसाठी वेळ कमी लागावा आणि तात्काळ कार्यवाही व्हावी म्हणून एक खिडीक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापीत एक खिडकी कक्षात एकाच ठिकाणी परवाने देण्याची कार्यवाही होणार आहे. चौकसभा व सर्व प्रकारच्या जाहीरसभांसाठी संबंधीत कार्यक्षेत्राचे पोलीस अधिकारी परवानगी देणार असून त्यासाठी अर्जासोबत जागा मालकाचे संमतीपत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा नाहरकत दाखला आवश्यक आहे.
सभेच्या ठिकाणी पोस्टर्स किंवा झेंडे लावण्यासाठी आणि खाजगी जागेवर जाहीरात फलक लावण्यासाठी नगर परिषदेचे मुख्यअधिकारी किंवा ग्रामपंचायतीतर्फे परवानगी देण्यात येईल. त्यासाठीदेखील वरीलप्रमाणे कागदपत्रे लागतील.फलक लावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे.
लोकसभा मतदारसंघात प्रचार वाहनाची परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकारी तर विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देतील. त्यासाठी अर्जासोबत वाहनमालकाचे संमतीपत्र,वाहन नोंदणीरपत्र,वाहन विम्याचे वैध प्रमाणपत्र, वाहनाचे वैध प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि वाहन चालकाचा वैध परवाना आवश्यक असेल.प्रचार कार्यालयाची परवानगी अर्जासोबत जागामालकाचे संमतीपत्र व ग्रामपंचायत अथावा नगर परिषदेचा नाहरकत दाखला जोडल्यावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून देण्यात येईल. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी संचालक नागरी विमान सेवा यांचेकडून परवानगी देण्यात येईल.त्यासाठी अर्जासोबत जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक किंवा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे नाहरकत प्रमाणपत्र व नगर परिषदेचा नाहरकत दाखल आवश्यक असेल.
ध्वनीक्षेपक आणि मिरववणूक किंवा रोड शोची परवानगी संबंधीत कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलीस अधिकारी देतील. यासाठी अर्जासोबत वाहन चालकाचा वैध परवाना आवश्यक राहील.केबल जाहीरातींना जिल्हा निवडणूक अधिकारी परवानगी देतील.त्यासाठी नमुना‘अ’ मधील अर्ज व जाहीरात मजकुर ध्वनीमुद्रण व रेकॉर्डींगच्या सीडीसोबत सादर करावाला लागेल.
जिल्हास्तरावर परवानगी देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परवाने मिळण्यासाठीचे अर्ज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत स्विकारले जातील.उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर आवश्यक परवानग्या तात्काळ देण्यात येतील.
पंचायत समिती,नगर परिषद आणि पोलीस विभागाचा जबाबदार प्रतिनधी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत एक खिडकी कक्षात उपस्थित राहील.तसचे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी तात्काळ परवानगी देण्यासाठी उपस्थित राहील.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेस्तरावरदेखील असाच एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.हेलिकॉप्टरचा दैनंदिन निवडणूक खर्च निवडणूक खर्च कक्षाला सादर करण्यात येणार आहे.संबंधितांनी याची नोंद घ्यावी,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांनी कळविले आहे.

 

एक खिडकी’च्या माध्यमातून पथनाट्याची परवानगी

नंदुरबार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार किंवा राजकीय पक्षांना नुक्क्ड नाटक अथवा पथनाट्याची परवानगी एक खिडकी कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर हा कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्या माध्यमातनू पथनाट्यासाठी परवानगी देण्याचे निवडणूक आयोगाने निर्देशित केले आहे.संबंधितांनी यांची नोंद घ्यावी,असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांनी कळविले आहे.

 

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी नंदुरबार यांनी 5 ते 19 एप्रिल 2019 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.सदरचे आदेश लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम,आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत.तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना,सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही.