निवडणूक अर्जाची अनामत रक्कम चिल्लर स्वरूपात सादर

722

मल्हार न्यूज प्रतिनिधी

पुणे लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून “भरत जैन सुराणा “यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज जिल्हा अधिकारी कार्यालय ,पुणे येथे सादर केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना अनामत रक्कम म्हणून भरावे लागणारे पंचवीस हजार रुपये त्यांनी निवडणूक कार्यालयातअनुक्रमे एक रुपये,दोन रुपये ,पाच रुपये ,दहा रुपये याची नाणी जमा करून चिल्लर च्या स्वरूपात भरली. रक्कम चिल्लर स्वरूपात असल्यामुळे निवडणूक कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चिल्लर मोजण्यास शर्तीचे प्रयत्न करावे लागले . “भरत सुराणा” अपक्ष उमेदवार यांच्याशी संवाद साधल्यावर कळले की त्यांचा चिल्लर स्वरूपात भरणा करण्यामागचा उद्देश असा होता की कोणत्याही सार्वजनिक कामाला करताना अधिकारीवर्ग हा सर्व सामान्य व्यक्तीस चिल्लर म्हणून समजतो आणि त्याची गणना देखील चिल्लर म्हणून केली जाते याच गोष्टीला पायबंद तसेच एक नव्या आशयाला घेऊन समाज निर्मिती करण्याचा मानस ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला .अपक्ष उमेदवार म्हणून समाजापुढे येत असताना अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे महत्त्वाचे असते असेही त्यांनी सांगितले. जैन समाजाचा विकास झाला पाहिजे ,जर मी खासदार झालो तर जैन समाजाचे अनेक प्रश्न केंद्रात मांडून त्यांना योग्य न्याय देण्याचा माझा निर्धार राहील असे ही त्यांनी कळविले.. निवडणूक कार्यालयात अनामत रक्कम चिल्लरच्या स्वरूपात भरल्यामुळे “भरत जैन सुराणा “हे लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत..