महायुतीचा आज सकाळी विविध गार्डनवर प्रचार

903

मल्हार न्यूज प्रतिनिधी

महायुतीचे ३६-शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा.शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज सकाळी शिरूर लोकसभा मतदार संघांतर्गत हडपसर विधानसभा मतदार संघात शिवसेना–भाजपा आरपीआय च्या वतीने मा.आ.महादेव बाबर व आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या विविध गार्डन मध्ये सकाळी व्यायामाला येणाऱ्या लोकांची भेट घेऊन त्यांना आढाळराव पाटील यांना प्रंचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.खा. आढाळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदार संघांतर्गत केलेली विविध कामे महायुतीचे कार्यकर्ते नागरिकांना समजावून सांगत होते.पंतप्रधान नरेंद मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून देश सुजलाम सुफलाम करण्याचे आवाहन मा.आमदार महादेव बाबर यांनी नागरिकांना केले.

यावेळी बाबर यांच्या सोबत मा.नगरसेवक भरत चौधरी, तानाजी लोणकर, राजेंद्र लोणकर, महेंद्र गव्हाणे, सतपाल पारगे, मदन शिंदे, भरत शेंडकर, महेंद्र भोजने, सोमनाथ हारपुडे, मामा भोईटे, प्रतिक लोणकर, संतोष गोरड,मारुती ननावरे, अजीज शेख यांनी कोंढवा भागातील शहीद अब्दुल हमीद गार्डन , अनुसया लोणकर गार्डन, आनंद वन येथील गार्डन येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तर आ.योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका वृषाली कामठे, नगरसेवक वीरसेन जगताप, नगरसेविका रंजनाताई टिळेकर, सुनील कामठे  यांनी कोंढवा ब्रुद्रुक परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डन येथे सकाळी व्यायाम करण्याऱ्या नागरीकांशी संवाद साधून शिवाजीराव आढाळराव पाटील यांना प्रंचंड बहुमताने निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून देशाला प्रगतीशील बनविण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. याप्रसंगी नागरिकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला.