हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

1281

मल्हार न्यूज प्रतिनिधी

माहेरवरून होंडा अॅक्टीव्हा आणि ५०००० हजार रुपये आण, असे म्हणून महिलेला मारहाण करून शिवीगाळ करणाऱ्या महिलेचा पती प्रथमेश दत्तात्रय पाटील , सासरे दत्तात्रय पाटील, सासू संगीता पाटील रा. गायकवाड नगर, दिघी, पुणे यांच्या विरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात भां.द.वि.२७/१९ , ४९८ (अ) ४०६,३२३,५०४,३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तिने या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता.

   याबाबत दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि प्रथमेश पाटील यांचे हिंदू धर्मानुसार लग्न ६ एप्रिल २०१८ रोजी झाले.लग्न ठरविताना आरोपी म्हणजेच महिलेचा पती हा डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनियर पास आहे ,असे खोटे सांगून लग्न करवून घेतले. लग्नामध्ये तुझ्या आई-वडिलांनी सोन्याच्या बांगड्या हातात केल्या नाहीत का असे विचारून पाटील कुटुंबांनी महिलेचा छळ सुरु केला. पण महिलेने याकडे दुर्लक्ष करत राहिली. तथापि तिचा छळ सुरूच राहिला. त्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच विषयावरून आणि फिर्यादी महिलेच्या आई वडिलांकडून तू तुझ्या भावाची  होंडा अॅक्टीव्हा घेऊन ये तसेच लग्नात हुंडा कमी दिला म्हणून आणखी ५०००० हजार रुपये घेऊन ये असे म्हणून महिलेला मारहाण, शिवीगाळ केली यामुळे सदर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला .या कारणांमुळे महिलेला ८ फेब्रुवारी २०१९ रोजी पाटील कुटुंबीयांनी माहेरी हाकलून दिले. यामुळे संबंधित महिलेने पती, सासू, सासरे यांच्या विरुद्ध शारीरिक ,मानसिक छळ करणे ,विश्वासघात करणे तसेच कौटुंबिक अत्याचार कायद्यांप्रमाणे दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

   पुढील तपास दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.