कोंढव्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे पथसंचलन

1557

मल्हार न्यूज प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्याच्या वतीने आज कोंढवा भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच निवडणूका निर्भयपणे, तणावमुक्त, शांतता पूर्वक पार पाडण्यासाठी पथसंचलन (रूट मार्च) चे आयोजन करण्यात आले होते.

कोंढवा परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अनिल पोलीस निरीक्षक पाटील यांनी रूट मार्च चे आयोजन केले होते. कोंढवा पोलीस ठाण्यापासून मिठानगर, नवाजीश पार्क, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण ते वीर तानाजी मालुसरे चौकापर्यंत ह्या पथसंचालनाचे आयोजन केले होते.याप्रसंगी एपीआय मोरे, पीएसआय शिंदे, पीएसआय काळे, पीएसआय करचे, पीएसआय मांजरे, देशमुख तसेच कर्मचारी रमीज मुल्ला, शेख, गोपाल दाभाडे, प्रल्हाद पवार, छगन चव्हाण, महेश राठोड, अनंत धनगर, राहुल माने आदी उपस्थित होते.