थापेवाडीत शेतकऱ्यांना कडब्याचे वाटप

692

मल्हार न्यूज प्रतिनिधी, सासवड

थापेवाडी तालुका पुरंदर येथील शेतकऱ्यांच्या गवताच्या गंजी जळून खाक झाल्याने दुष्काळामुळे जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला,  बी एम प्रतिष्ठान चे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी एक टेम्पो कडबा शेतकरी यांना दिला पुरंदर तालुक्यात सध्या पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असताना चारा जळून चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्याची मदत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी शेतकरी नारायण खवले ,अमित खवले, तुकाराम खवले यांना बी एम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी चाऱ्याचा टेम्पो स्वाधीन केला. यावेळी ग्रामस्थ हनुमंत खवले अशोक खवले, रोहित खवले, पत्रकार म्हस्कू खवले, चंद्रकांत खवले, ऋषिकेश खवले ,आदी उपस्थित होते.