Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणे‘प्रवास’ अमेरिकेचा

‘प्रवास’ अमेरिकेचा

मल्हार न्यूज, ऑनलाईन

आशयविषय, सादरीकरणाच्या नव्या मांडणीसह मराठी चित्रपट आता नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. त्यातूनच परदेशातील नयनरम्य प्रेक्षणीय स्थळांचा शोध घेऊन अनेक निर्माते आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण परदेशात करू लागले आहेत. या निमित्ताने मराठी चित्रपटांमध्ये परदेशातील लोकेशन्स दिसू लागली आहेत. प्रवास या आगामी मराठी चित्रपटामधून अमेरिकेचे दर्शन मराठी प्रेक्षकांना घडणार आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिस, लॉस वेगास, फिनिक्स या भागात चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.

प्रवास या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे…ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे प्रथमच एकत्र काम करणार आहेत. यासोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदि कलाकारांच्या यात भूमिका आहेत. मानवी नातेसंबंध अधोरेखित करतानाच यश आणि नातं या दोन गोष्टींचा प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे.

परदेशातील चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल बोलताना दिग्दर्शक शशांक उदापूरकर सांगतात की, चित्रपटाच्या कथानकानुसार काही प्रसंग अमेरिकेत चित्रीत झाले असून त्या शहरांचे व परिसराची विहंगम दृश्ये या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळतील. या नयनरम्य शहरांतील १७ दिवस केलेल्या चित्रीकरणाचा अनुभव संपन्न करणारा होता.

ओम छंगानी फिल्म्स निर्मित प्रवास चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे. गीतलेखन गुरु ठाकूर यांचे आहे. कलादिग्दर्शक महेश साळगांवकर तर संकलन संजय सांकला यांचे आहे. बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम-सुलेमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. रंगभूषा श्रीकांत देसाई तर वेशभूषा दिप्ती सुतार, तेहशीन अन्वारीयांची आहे. पवन पालीवाल या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!