गिफ्टचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

783

मल्हार न्यूज प्रतिनिधी , भोसरी
सोशल मिडीयावर मैत्री करून ३२ वर्षीय महिलेला गिफ्टचे अमिष दाखवून २ लाखांची फसवूणक केल्याप्रकरणी मेकॉन वायने वय ४० वर्षे व त्याच्या दोन साथीदारांविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात ३११/२०१९, भां.द.वि. ४१९,४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा क६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबधित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, आरोपींचा शोध सरू आहे.
याबाबत भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेकॉन याने महिलेशी फेसबुक वर मैत्री केली. तो वारंवार महिलेशी चॅट करत राहिला. त्याने महिलेचा विश्वास संपादन करून फेसबुक मेसेंजरवर गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी २लाख १५ हजार रुपये घेऊन फिर्यादी महिलेला गिफ्ट किंवा पैसे परत केले नाही म्हणून तिची फसवणूक झाल्याने तक्रार दाखल केली आहे.