आई व अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

837

मल्हार न्यूज प्रतिनिधी

आळंदी ते चऱ्होली खुर्द गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वॉकिंग साठी जात असलेल्या महिला व तिची १६ वर्षीय मुलीच्या तोंड ओळख असलेल्या महादेव देवकाते (रा.हनुमानवाडी केळगाव) याने पाठीमागून येऊन मुलीचा हात धरून मुलीच्या आईला व मुलीला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भां.द.वि.३५४,५०४,३२३ पॉस्को कायदा क.८,१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु असून त्याला अटक झालेली नाही .                                                                                                                                           याबाबत आळंदी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार ,९ एप्रिल रोजी महिला व तिची सोळा वर्षीय मुलगी वॉकिंग साठी घराजवळच असलेल्या  आळंदी ते चाऱ्होली खुर्द गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने स्वामी समर्थ मंदिराजवळून पायी  जात असताना, तोंड ओळख असलेला महादेव देवकाते हा मुलगा त्यांच्या पाठीमागून पाठीमागून येऊन मुलीचा हात धरून तिला त्याच्या जवळ ओढून तू मला खूप आवडतेस असे म्हणून तिची छाती दाबून , गालाचे चुंबन घेऊन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. मुलीच्या आईने आरोपीस हे कृत्य करताना पाहिले असता तो तेथून पळून जाऊ लागला , त्याला पकडण्याचा त्यांनी  प्रयत्न केला असता त्याने त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करून पळून गेला. याबात पुढील तपास सुरु असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.