स्वामीराया तुमच्या भेटीला

684

अनिल चौधरी,पुणे

हे गीत श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी म्हणजेच ७ एप्रिल रोजी यूट्यूब च्या माध्यमातून प्रदर्शित झाले आणि श्री स्वामी भक्तांचा उदंड प्रतिसाद लाभला.

रत्नाकर आंबेरकर आणि मल्हार प्रॉडक्शन निर्मित व किशोर नटे दिग्दर्शित *”स्वामीराया”* हे गाणे विवेक नाईक यांनी गायले आहे. या गाण्याचे गीत व संगीत संग्राम जाधव यांनी केले आहे तसेच मास्टर ईशांक यांनी संगीत संयोजन केले आहे.
हे कव्वाली शैलीतील गीत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेते संजय खापरे यांच्यावर हे गीत चित्रित झाले आहे.

हे फक्त एक भक्तिगीत नसून त्यातील सुंदर कथा ही संजय खापरे यांच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि किशोर नटे यांच्या दिग्दर्शनाने खूप छान खुलले आहे.

श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी अनेक गाणी अर्पण झाली असतील पण या गाण्याचे वेगळेपण म्हणजे श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण होणारी ही पहिलीच हिंदी कव्वाली असावी.

त्यामुळे सर्व कलाकारांनी भक्तीभावातून निर्माण केलेलं हे वेगळ्या धाटणीचे गीत
नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय यात शंकाच नाही.