चित्रपट निर्मिती च्या विविध तंत्रावरील कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

839

मल्हार न्यूज ऑनलाईन,

 चित्रपट हे समाजावर सखोल परिणाम करणारे माध्यम आहे. या माध्यमाद्वारे अभिव्यक्त होण्यासाठी, चित्रपट निर्मिती संदर्भातील विविध बारकावे, संबंधित तंत्रांची ओळख वव्याप्ती समजून घेण्यासाठी एरंडवणा येथील मोंताज फिल्म स्कूल मध्ये  पटकथा लेखन, छायाचित्रण, संकलन व अभिनय या  चित्रपट निर्मिती साठी आवश्यक असलेल्या तंत्रावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

चित्रपट क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना या क्षेत्राविषयी सखोल माहिती, या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी, शक्यता तसेचमर्यादा या विषयी जागरूकता आणि ज्ञान असणे आवश्यक असते. नुकताच पार पडलेल्या कार्यशाळे मध्ये अनुभवी तंत्रज्ञ व कलाकारांनी चित्रपट निर्मिती विषयी मार्गदर्शन केले. चित्रपट संकलना विषयी अमृता कुलकर्णी, विराज मुनोत व तुषार सकपाळ तर छायाचित्रणासंबंधी शैलेंद्र निर्मळे व अभिषेक इंद्रेकर यांनी मार्गदर्शन केले. धनंजय भावलेकर व अक्षय कदम यांनी पटकथालेखनाविषयी तर अभिनयासंबंधी संजय मोरे, जयेश संघवी व रणजित मोहिते या नाट्य व सिने अभिनेत्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेचे आयोजन मोंताज फिल्म स्कूलच्या​ समन्वयक सायली तनपुरे यांनी केले होते.