लाचेची मागणी करणाऱ्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक

1227

अनिल चौधरी,

मालमत्तेची चौकशी न करण्यासाठी तसेच तपासात सहकार्य करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना , पोलीस उपनिरीक्षक भीमा नरके नेमणूक –नागपूर शहर, विजय जाधव नेमणूक – जीविशा जळगाव, शामकांत पाटील , अरुण पाटील जळगाव यांना तक्रारदारांकडून ३,००,०००(तीन लाख)रुपये लाचेची मागणी करून लाच मिळविण्याचा प्रयत्न केला प्रकरणी त्यांच्याविरुद्ध चाळीसगावशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील शामकांत पाटील आणि अरुण पाटील अँटी करप्शन ब्युरो चे कर्मचारी आहेत.

   याबाबत जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध अँटी करप्शन ब्युरो ,जळगाव पथकाने लाचमागणी व स्वीकारल्याबाबत गुन्हा दाखल केला होता.सदर या गुन्ह्याबाबत तक्रारदार यांना दहा दिवसांची पोलीस कस्टडी आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश मिळाले होते. सदर मालमत्ता चौकशी न करण्याकरीता आरोपी पोलीस उपनिरीक्षक भीमा नरके यांनी अँटी करप्शन ब्युरोचे कर्मचारी शामकांत पाटील आणि अरुण पाटील यांच्या मार्फत तक्रारदारांकडून ३,००,०००० रुपये लाचेची मागणी केली. पण तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळल्याने अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी अँटी करप्शन ब्युरोच्याच कर्मचाऱ्यांना पकडले असून त्यांच्यावर चाळीसगावशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.