पोलिसांच्या तत्परतेने महत्वाची कागदपत्रे सापडली

675

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

माजी आमदारांची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग टॅक्सीमध्ये विसरली जाते……. पोलिसांत तक्रार दाखल……….. आणि पोलिसांचा अतिशय तत्परतेने तपास आणि आश्र्चर्य म्हणजे २४ तासांत कागदपत्रे असलेली बॅग तक्रारदाराच्या हातात …… हि काही फिल्मी कहाणी नसून प्रत्यक्षात घडलेली काहाणी असून पोलिसांनी कसून तपास केल्यास एका हिंदी म्हणी प्रमाणे ढूंढनेसे खुदा भी मिल जाता है, याची प्रचीती मा.आ.लोखंडवाला यांना आली.

याबाबातची सविस्तर माहिती अशी कि, दिनांक १३ एप्रिल रोजी रोजी दुपारी 15.40 वा माजी आमदार सोहेल लोखंडवाला यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग टॅक्सीमध्ये विसरली होती. याबाबत त्यांनी दि. १४ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस वरिष्ठ पोलीस निरीक्षक व दिवस पाळी परिवेक्षक पो. नि. गायकवाड यांच्या आदेशानुसार  सपोनि भंडारे व पोउपनि पवार, पोलीस हवालदार खोत व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन व सीसीटीव्ही कॅमेरे यांची मदत घेऊन सदरच्या टॅक्सीचा नंबर मिळविण्यात आला व आरटीओ कडून नाव पत्ता मिळवून वडाळा येथे शोध घेतला. त्यानंतर सदर टॅक्सीच्या इन्शुरन्स ची माहिती घेऊन टॅक्सी मालकाचा मोबाईल क्रमांक मिळवला व सदरची टॅक्सी शोधून काढण्यात आली व व सदरचे हरवलेले कागदपत्र टॅक्सी ड्रायव्हर अनिल मोरया यांचेकडून वाशी नाका चेंबूर येथून ताब्यात घेण्यात आले आहेत सदरची सर्व कागदपत्रे वरिष्ठांच्या परवानगीने माजी आमदार सोहेल लोखंडवाला यांना परत करण्यात आलेली आहे.

 सदरची कारवाई दिवसपाळी पोनि गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भंडारे व पोउनि पवार व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी पार पाडली