सराईत गुन्हेगाराकडून अग्निशत्र आणि जिवंत काडतुसे जप्त

688

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खडक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी खडक परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदारामार्फत माहती मिळाली कि, रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय दादू खुडे ह्याच्या कंबरेला पिस्तुल असून तो धम्मपाल चौक कासेवाडी, भवानी पेठ येथे थांबला आहे. सदरची माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या निदर्शनास आणून आरोपी अजय खुडे याला अग्निशस्त्र आणि जिवंतकाडतुसेसह अटक करण्यात आली.

   याबाबत खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलेही घातक शस्त्र बाळगणे कायद्याने मनाई आहे. अजय खुडे हा भवानी पेठ येथे अग्निश्स्त्रासह थांबल्याची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अजय खुडे यांस कंबरेला काय आहे याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेच्या मागील बाजूस ३०,००० हजार रुपये किमतीचे १ गावठी पिस्टल व ४०० रुपये किमतीचे २ नग जिवंत काडतूस मिळून आले. चौकशी अंती अजय खुडे रा.लेन. नं.१ , साईनाथनगर,खराडी पुणे यांस आर्म अॅक्ट क.३ सह २५ म.पो.अधिनियम कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभागाचे रवींद्र सेनगावकर , परिमंडळ १चे पोलीस उप आयुक्त सुहास बावचे, सहा पोलीस आयुक्त फरासखाना प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उत्तम चक्रे व.पो.नि (गुन्हे) तपास पथकाचे प्रभारी सहा.पो.निरीक्षक उमाजी राठोड ,पोलीस कर्मचारी विठ्ठल पाटील, विनोद जाधव, संदीप पाटील, रवी लोखंडे, विशाल जाधव, आशिष चव्हाण, प्रमोद नेवसे, महावीर दावणे, समीर माळवदकर,बंटी कांबळे, राकेश क्षीरसागर, इम्रान नदाफ, योगेश जाधव, हिम्मत होळकर यांच्या पथकाने केली.