कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणले तीन गुन्हे ;सराईतला अटक

812

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

कोंढवा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे  कर्मचारी  राजेश शेख, योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडूळे, अमित साळुंखे सुरेंद्र कोलगे, जगदीप पाटील यांना विश्वसनीय सूत्रदाराकडून माहिती मिळाली कि एक व्यक्ती रिक्षात गॅस कटर, सिलेंडर घेऊन संशयित रीत्या कोंढवा परिसरात फिरत असून काहीतरी मोठे कांड करणार आहे. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता कोंढवा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वरिष्ठ पोलिसांनी माहिती देऊन परिसरात शोध मोहीम सुरु केली असता त्यांनी आरोपी कलेश वनाप्पा शिंगे वय २३ वर्षे रा. स.नं.२३ लक्ष्मीनगर,पार्वती पुणे यास अटक  केली आहे.

 कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलेश शिंगे हा रिक्षाचालक त्याच्या रिक्षात एक गॅस कटर, सिलेंडर घेऊन फिरत असताना त्याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक गॅस सिलेंडर व एक रिक्षा चोरी केली होती.तसेच बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देखील एक रिक्षा चोरी केली होती. त्याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात १५०/१९० भां.द.वि.३७९, तसेच सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ऑक्सिजन सिलेंडर चोरला होता. तसेच त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात २३५/१९ , भां.द.वि.३७९, २०४/१९ भां.द.वि ३७९ असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहे. कोंढवा पोलिसांनी अत्यंत कसोशीने आणि तप्तरतेने तपास केल्याने आरोपीला अजून एक मोठा गुन्हा करण्यावाचून परावृत्त करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत , त्यामुळे कोंढवा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  सदरची कामगिरी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन मोरे, पो.उप.नि.संतोष शिंदे, पो.कर्मचारी राजेश शेख, इक्बाल शेख,विलास तोगे, अमित साळुंखे, सुरेंद्र कोलगे,संजय कळंबे, पृथ्वीराज पांडूळे,सुनील धिवर,जयंत चव्हाण,किरण मोरे, निलेश वणवे, पो.शि. जगदीश पाटील अजीम शेख,उमाकांत स्वामी यांच्या पथकाने केली.