H2O सिनेमाला मिळतोय भरघोस प्रतिसाद !

785

मल्हार न्यूज प्रतिनिधी,जळगाव

पाळधी  येथील शेतकरी कुटूंबात जन्म झालेले सुनिल झवर यांची लहानपणापासुन ग्रामीण भागातील जनजीवनातुन जडणघडण झाल्यामुळे दुष्काळ कसा असतो, त्याची दाहकता कशी असते, पाण्याची होणारी भीषण टंचाई ती त्यांनी आपल्या संवेदनशील मनानी अनुभवलेली आहे. दुष्काळामुळे शेतक-यांची होणारी कुचंबना व त्यातुन आत्महत्येकडे झुकणारा शेतकरी अशा परीस्थितीवर भाष्य करणारी मिलींद पाटील यांच्या संकल्पनेतुन साकार झालेली कथा सुनिल झवर सर यांना खुप आवडली यातुनच त्यांनी आपल्या “जी.एस.फिल्म प्राँडक्शन” च्या माध्यामातुन निर्मीती करण्याचे ठरविले आणि हळुहळु “H2O” या चित्रपटाने गती घेतली तर चित्रपट क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व व या चित्रपटाचे लेखक असलेले मिलींद पाटील यांनी दिग्दर्शनाची धुरा स्वताच्या खांद्यावर घेतली…”H2O म्हणजे पाणी” व “पाणी म्हणजे जीवन” हे या चित्रपटाचे ब्रिद असुन या चित्रपटाचा विषयच मुळी काळजाला हात घालणारा असुन अनेक दिवसातुन एक वेगळा चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे..आज महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्यासह अनेक भागात दुष्काळाची तीव्रता व भिषणता मोठी असल्याचं जाणवते… जिथे माणसालाच पाणी नाही तिथे जनावरांना कुठुन आणणार हा यक्ष प्रश्न ही असल्याने “पाण्यासाठी दाही दिशा” अशी परीस्थिती आज सगळीकडे असताना त्यावर मात करण्यासाठी एक चळवळ म्हणुन एकवटणारी तरुणाईचं आशादायी चित्रण या चित्रपटात आहे त्यामुळे तो शेवटी सुखद वाटतो. खरच आज समाजातील असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तरुणाईची खरी गरज आहे यावर हा चित्रपट अधोरेखित करतो.

निर्माता सुनिल झवर हे माहेश्वरी- मारवाडी कुटुंबातुन पुढे आले असले तरी घरची परिस्थिती गरीबीची होती परंतु धनगर समाजाचे दैवत असलेल्या बाळुमामावर त्यांची व त्यांच्या कुटुंबीयाची गाढ श्रध्दा आहे..आज ही ते वेळ काढुन जळगावहुन कोल्हापुर नजिक आदमापुरला जावुन बाळुमामाचे न चुकता दर्शन घेतात असा माणुस विरळाच आहे… बाळुमामावर श्रध्दा व व्यवसायावर प्रामाणिक निष्ठा ठेवुन त्यांनी आपला व्यवसाय प्रगतीपथावर नेला. आज ते “स. न. झवर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे” संस्थापक असुन एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक सदस्य आहेत… चित्रपट क्षेत्रात भरीव काम करुन दर्जेदार कलाकृती निर्माण करण्याचा त्यांचा पुढे मानस आहे.

शिक्षणासाठी शहरात राहणार्या तरुणांची हि कथा असुन शहरामध्ये मिळणार्या भौतीक सुखांना फाटा देऊन ग्रामीण भागात जाऊन काळ्या आईशी असणारी आपली नाळ जोडुन ती भक्कम करण्यासाठी खेड्यातील पाणी टंचाईवर मात करु पाहणार्या तरुणाईचं प्रतिनिधित्व हि काँलेजवयीन मुले मुली/मुले करतात. एन. डी. अशोक, सुप्रित निकम, धनंजय धुमाळ, शीतल अहिरराव अशा अनेक नविन चेहऱ्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी सुनिल झवर सर यांनी चित्रपटात दिली. कार्यकारी निर्माता म्हणुन गोविंद जवळ व सहनिर्माता गोपाल झवर, पवन झवर  यांनी खुप मेहनत घेऊन प्रोजेक्ट पार पाडला. त्याचबरोबर मिलिंद पाटील व जगदिश नेवे यांच्या सारखी जीवाला जीव देणारी  मीत्र मंडळी मिळाली.