Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेअमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी

अनिल चौधरी, पुणे

कियारा’ हे नाव सध्या घराघरांत ऐकू येतंय. महिलावर्गातून बऱ्याचदा निंदा-नालस्तीची बळी ठरणारी ही व्यक्तिरेखा आहे ‘घाडगे आणि सून’ या मालिकेमधील. कियारा उर्फ *प्रतीक्षा मुणगेकरचा* करिअर ग्राफ उंचावणारी ही भूमिका सध्या प्रचंड प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत व्हिलनिश भूमिकेत दिसणारी प्रतीक्षा लवकरच तुम्हाला एका हटके भूमिकेत दिसणार आहे. ‘बाबो’ या आगामी चित्रपटात प्रतीक्षा आणि अमोल कागणेची जोडी जुळवण्यात आली असून अमोलची प्रेयसी म्हणून रसिकांच्या भेटीस येईल. नटखट, प्रेमळ-लाघवी आणि तितकीच समंजस प्रतीक्षा श्रीमंत घराण्यातली आहे उलट अमोल हा मध्यम वर्गीय. अमोल आणि प्रतिक्षाच्या प्रेमाला समाज मान्यता लाभणार का ? त्यांचं प्रेम यशस्वी होतं का ? घरच्यांचा विरोध श्रेष्ठ कि प्रेम ? काठ-शाहचा हा खेळ गमतीशीर पद्धतीने ‘बाबो’ मध्ये मांडला आहे.

अमोल कागणे या तरुणाने पदार्पणातच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये यशस्वी निर्मात्याचे बिरुद पटकावलं. अमोल लक्ष्मण कागणेने खऱ्या अर्थाने मराठी मनोरंजनक्षेत्राला नवसंजीवनी मिळवून दिली आहे. ‘हलाल’, ‘लेथ जोशी’ आणि ‘परफ्युम’ या चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर आत्ता अमोल कागणे अभिनयक्षेत्रासाठी सज्ज झाले आहेत. पुण्यामधील ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या अमोल कागणेने तब्ब्ल २६ हुन आधी नाटकांत अभिनय केला आहे. तर प्रतीक्षा मुणगेकर या नवोदित अभिनेत्रीने ह्या आधी ‘विडा एक संघर्ष’ आणि ‘मातंगी’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलेली आहे. शिवाय ‘कियारा’ हे तिचे सध्या गाजत असलेले पात्र सध्या अतिशय लोकप्रिय आहे.
मल्हार फिल्म्स क्रिएशन्सचा ‘बाबो’ ह्या चित्रपटातून अमोल आणि प्रतीक्षा ह्यांची युथफूल जोडी आपल्यालाही प्रेमात पडेल अशीच आहे. रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘बाबो’ या चित्रपटात अमोल आणि प्रतीशची लव्हेबल केमिस्ट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी रोमँटिक ट्रीट असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!