Monday, April 28, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेदिग्दर्शक मकरंद मानेच्या "कागर"ची खरी खुरी गोष्ट

दिग्दर्शक मकरंद मानेच्या “कागर”ची खरी खुरी गोष्ट

मल्हार न्यूज प्रतिनिधी,
दिग्दर्शक मकरंद माने राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रिंगण, यंग्राड या चित्रपटानंतर नवा चित्रपट घेऊन येतोय… सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या उदाहरणार्थ निर्मित आणि व्हायकॉम १८ स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट म्हणजे “कागर”!
 २६ एप्रिलला प्रदर्शित  होणाऱ्या या चित्रपटाची मकरंदनं घोषणा केली, तेव्हा प्रेक्षकांना प्रश्न पडला कागर म्हणजे काय, “कागर” या शब्दाचा अर्थ काय… कागर म्हणजे काय हे सांगण्यासाठी मकरंदनं त्याची एक गोष्टच प्रेक्षकांसह शेअर केलीय. त्याच्या या गोष्टीतून प्रेक्षकांना कागर या शब्दाचा अर्थ नक्कीच उमगेल...
इफिजिनीया आणि माझं प्रेम प्रकरण
रात्रभर झोप लागलीच नाही पण नेमकं ठरत नव्हतं पुढे कसं जायचं. काहीही झालं तरी आयुष्यात पाहिलेल्या या स्वप्नाचा पाठपुरावा तर करायचा होता हे ठाम ठरलं होतं.
१६ – १७ वर्षांपूर्वी पुण्यात आल्यावर वेळ तसा जात नव्हता. एकतर ओळखीचे कोणीच नाही आणि जे गप्पा मारत होते ते फक्त शिकवायचा प्रयत्न करत होते. पण त्या दिवशी इफिजिनीयाला भेटलो आणि तिने झोपच उडवली. 
तिच्यावर माझं एकतर्फी प्रेम जडलं होत. मग मी रोज तिला जाऊन पाहू लागलो. आणि पक्क ठरवलं की काहीही झालं तरी पुढचं आयुष्य तिच्या सानिध्यातच घालवायच. तिने तसा नकार नव्हता दिला पण यामध्ये आमचे आदरणीय वडील व्हिलन होऊ पहात होते. त्यांचंही काही चुकत नव्हतं म्हणा. आजपर्यंत माझ्या नाकावरची माशी उठवताना पण त्यांनी पाहिलं न्हवत आणि एक दिवस अचानक त्यांना येऊन मी म्हणालो की मी इफिजिनीया पाहून आलोय आणि इथून पुढे मला फक्त कलाकार म्हणून जगायचं आहे आणि बस तेवढंच. त्यांनी खूप चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि बस पाहिलं. मी त्यांचं पाहणं खूप मनाला लावून नाही घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी परत जाऊन तेच वाक्य पाठ केल्यासारखं म्हणून दाखवलं. ते आम्हाला भेटायला आले होते अजून 2 दिवस राहणार होते. पण दुपारी परत निघाले अन जाताना म्हणाले, छंद आणि पोट भरण यात जमीन अस्मानाचा फरक असतो तो आधी समजून घे.
मी पण विचार केला आपण खूप घाईघाईत निर्णय घेतोय का? पण ही इफिजिनीया स्वप्नातून सतत खुणावत होती. मी जरा दुुर्लक्ष केलं पण ती पिच्छा सोडायला तयार नव्हती मग माझ्या लक्षात आलं की true love म्हणजे हेच की. याच्या पलीकडे काय असत. मग काय उचललं बोचक आणि निघालो मायानगरीत नशीब आजमावयला. घर सोडून पळून जाताना जाणवत होतं की प्रवास मुंबई पुरता नसून बराच पुढचाय. सोबत पुरेसे पैसे नव्हते आणि तिथेच पैसे गोळा करताना घरच्यांनी एका मित्राकडे पकडलं. एका अर्थाने पकडलं ते बरं झालं त्याचा फायदा म्हणून की काय त्यांनी लगेच ललित कला केंद्र या कलाकार गृहात भरती केलं. वडील परत म्हणाले जे करायचं असेल ते नीट शिकून अभ्यास करून कर.
मी खुश होतो ललित मध्ये तर इफिजिनीया भेटली होती. ललितमध्ये मस्त चाललं होतं एका आदर्श बायको प्रमाणे ती माझी काळजी करे. प्रेमळ आईप्रमाणे जिथे अडेल तिथे कान पकडून शिकवत असे. चोमड्या बहिणीप्रमाणे वेळोवेळी चाड्या लावून नसते फालतू धंदे बंद करत असे. अस घरच्या वातावरणात बोहल्यावर चढायला तयार तर झालो पण इफिजिनीयाच्या वडिलांना तिला मागणी घालण्यासाठी काहीतरी कामधंदा करण गरजेचे होते म्हणून परत पाय मुंबईच्या दिशेला वळाले. पण आता मला नेमकं माहीत होतं काय करायचं आहे ते.
मार्ग कठीण, अवघड होता पण अशक्य नव्हता. तेंव्हा जे काम करायला सुरुवात केली ती आजतागायत थांबवली नाही. माझा आणि इफिजिनीया संसार मस्त चालला आहे. रिंगण नावाचं बाळ नुकतंच मोठं होऊन त्याच्या स्वप्नांची वाटचाल करायला बाहेर पडलंय. मोठं झालेलं यंग्राड पोरगं  घाटावर मस्त रमलय. अन स्वप्नाळू मुलीची उंबरठ्याबाहेर पडण्याची कथा म्हणजे कागर. तिचा प्रवास नुकताच सुरू झालाय. त्याच्यावर योग्य ते संस्कार करणं चालू आहे. मी ठरवलंय की माझ्या वडिलांनी जशी मला माझ्या स्वप्नांची योग्य वाट दाखवली तसच मी आदर्श वडील होण्याचा प्रयत्न तर नक्की करेन. आणि आमच्या प्रेमाचा वटवृक्ष नक्कीच ओळखला जाईल असा तयार करेन अन त्याला नव्या विचाराचा कागर फुटू देईन.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!