मल्हार न्यूज प्रतिनिधी,
झी टॉकीज या वाहिनीने फक्त चित्रपटच नाहीत तर अनेक असे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आली आहे. त्यातील एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे गाजर कीर्तनाचा. या कार्यक्रमाने नुकताच २ वर्षांचायशस्वी प्रवास पूर्ण केला. याच निमित्ताने या कार्यक्रमच सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेत्री दीप्ती भागवत यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद
१. कीर्तनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं असं नेमकं का वाटलं? कीर्तन आणि आध्यात्मिक विषयांविषयी तुझं मत काय आहे?
एखादं कार्य आपण करावं ही आपली इच्छा तर असतेच, पण कधी कधी ते कार्य आपल्याकडून घडावं अशी परमेश्वरी इच्छाही असते. आज २ वर्ष पूर्ण करून तिसऱ्या वर्षातही मी हा कार्यक्रम करू शकते आहे, ते या परमेश्वरी इच्छेमुळेच असावं.एकदा कुणीतरी म्हटलं होतं की आपण कुठे असावं, काय करावं ही योजना आधीच आखून ठेवलेली असते. ‘गजर कीर्तनाचा’सारख्या अद्वितीय कार्यक्रमासाठी भगवंताने माझी निवड केली यासाठी मी अत्यंत कृतार्थ आहे.२. सुत्रसंचालनाच्या या प्रवासातील एखादी छानशी आठवण आम्हाला सांगशील का?दीप्तीताई नमस्कार, रामकृष्णहरी, श्रीहरीमाऊली असं म्हणत एखादा विठ्ठलभक्त कधीतरी भेटतो. मनाला समाधान वाटतं अशावेळी.पुण्याला असेच एक आजोबा भेटले होते. या कार्यक्रमामुळे ते वैफल्यातून बाहेर आल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्यामुळे कुणाचंतरी भलं होतंय हे कळल्यामुळे मी समाधानी झाले. अशा आठवणी या कार्यक्रमामुळेच मिळू शकल्या. ३.युवा पिढी किर्तनाकडे कसं पाहते? महाराष्ट्रातील या कलेचं भविष्य काय असेल असं तुला वाटतं?
मागच्या आषाढीला सोलापूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे एका तरुणाने चक्क पायावर लोटांगण घातलं. मला थोडंसं अवघडल्यासारखं झालं. त्याच्यासोबत त्याचा कॉलेजचा ग्रुप होता. कॉलेजला जाण्याआधी कार्यक्रम आवर्जून बघतअसल्याचं त्यांनी सांगितलं. आमच्या विचारांत परिवर्तन होतंय, जगण्याची दिशा सापडतेय असंही ते म्हणाले. हा कार्यक्रम कधीही संपवू नका अशी विनंतीदेखील केली. म्हणजे तरुण पिढी सुद्धा आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करते आहे यातशंका नाही. म्हणूनच, कीर्तनकला कायम टिकून राहील. ४. कार्यक्रमाच्या निमित्ताने किती मंदिरांना भेट दिलीस? हा अनुभव कसा होता? ‘झी टॉकीज’वरील ‘गजर किर्तनाचा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ग्रामीण महाराष्ट्र पाहिला. खरं सांगायचं तर, हा कार्यक्रम नसता तर तीर्थक्षेत्र, मंदीरे वगैरेंना मी कधीच भेट दिली नसती. कोकण, शिर्डी, जुन्नर, नाशिक, पुणे अशी कितीतरीनावं घेता येतील. या सगळ्यांत माझं लाडकं ठिकाण आहे, ते म्हणजे आळंदी! इंद्रायणीच्या काठावर, भर थंडीतदेखील पखवाजाचा रियाज करणारी मंडळी पाहिली आहेत. इथल्या सकारात्मक वातावरणाचा अनुभव घेतल्याशिवाय यातील खरीमजा कळणारच नाही.५. कीर्तनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असल्यामुळे तुझ्यात काय बदल झाला? देवावर तुझी असणारी श्रद्धा, विश्वास यात काही फरक पडला का?पूर्वजांचे सत्कर्म आणि माझा भक्तीमार्गाकडे असणारा ओढा, यामुळे मी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहे. या कार्यक्रमामुळे मी वारीत सहभागी होऊ शकले. कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या अनुभवांमुळे, अध्यात्म, भक्ती, तत्वज्ञान आणिआपल्या समृद्ध परंपरेवरचा विश्वास दृढ झाला.