फसलेला ‘कलंक’

1002

भूपाल पंडित,पुणे

करण जोहरचे चित्रपट म्हटलं की भव्यता येणार हे समीकरण आहे. लार्जर दॅन लाईफ दाखवल्याशिवाय त्याचा चित्रपट पूर्ण होत नाहीत्यात मल्टीस्टारर म्हटल्यावर विचारायला नको. कलंक’ या चित्रपटात प्रचंड भव्यता आहेनावाजलेले कलाकार आहेतडान्स आहे मात्र जे असायला हवे तेच नाही म्हणजे दमदार कथा. यामुळे चित्रपट मोठ्या अपेक्षेने आलेल्या प्रेक्षकाला निराश करतो.

कलंक’ ची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. त्या काळात घडलेली आणि काळाच्या पडद्याआड गेलेली एक प्रेमकथा या निमित्ताने उलगडते. कॅन्सरग्रस्त सत्या (सोनाक्षी सिन्हा) आपल्या प्रेमासाठीपतीसाठी रुपला (आलिया भट्ट) तिच्या घरी घेऊन येते. पण यासाठी रुप तिच्या पतीशी (आदित्य रॉय कपूर) लग्न करूनच घरी येण्याची अट ठेवते. या नात्यात आदर असेल पण प्रेम नसेल’ हे लग्नाच्या पहिल्याच दिवशी देव (आदित्य) रुपला स्पष्ट करतो. गायन शिकण्यासाठी रुप शहरातील हिरामंडी या भागात जाते. तिथे तिची भेट बहार बेगमशी (माधुरी दीक्षित) होते आणि बहार बेगमचा मुलगा जफरच्या (वरुण धवन) प्रेमात ती पडते. जफर हा देवचे वडील (संजय दत्त) आणि बहार बेगम यांच्या अनैतिक संबंधातून जन्मलेला मुलगा असतो. रुप आणि जफरच्या प्रेमापासूनच मूळ कथेला सुरुवात होते. पुढे काय घडणार याची कल्पना हा चित्रपट पाहताना अवघ्या दहा मिनिटात येते.

चित्रपटाच्या कथेत कुठेच सुसूत्रता दिसत नाही. फाळणीपूर्वीचा काळलाहोरमधील हुस्नाबाद इथला हिंदू-मुस्लीम वादविवाहबाह्य संबंधातून जन्मलेला मुलगाकर्तव्यदक्ष मुलगी आणि सून या सर्व घडामोडी एकत्र करून एक कथा सादर करण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक अभिषेक वर्मनने केला आहे. तसं बघितलं तर भरपूर मसाला या कथेत होता मात्रकथेवरची अत्यंत ढिली पकड. विस्कळीत पटकथा. बोजड आणि अवजड संवाद आणि फसलेलं संकलनया बद्दल सांगायचे तर  चित्रपटात एक संवाद आहे. तुम्हारे गाने मिठास है लेकीन नमक कम है. हेच वाक्य चित्रपटाला लागू होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर वरुण धवन हीरो आहे. त्याला मोठं काम आहेपण त्याचा प्रभाव नेहमीसारखा पडत नाही. संजय दत्त तर फक्त खांद्यावरची शाल ठीक करत वावरण्यापुरताच दिसतो. माधुरी दिक्षितच्या वाट्यालाही एका गाण्या पलीकडे फार काही आलेले नाहीआलिया भटने मात्र आपली बाजू भक्कम सांभाळली आहेतिच्या लुक्स पासून डान्स पर्यत सर्वच गोष्टी लक्षात राहतात. आदित्य रॉय कपूरने ही आपली भूमिका चोख बजावली आहेकिंबहुना कुणाल खेमू त्याच्या ग्रे शेड मुळे लक्षात राहतो.

कलंकमधील गाणी उत्तम आहेत. मात्र ती उगाच टाकल्यासारखी वाटतात. चित्रपट पाहताना अनेक प्रश्न पडतात तसेच कुठेही भावनिकदृष्ट्या प्रेक्षक कथेशी एकरूप होत नाही. एकंदरीत सांगायचे तर भव्यदिव्य सेट्सउत्तम वेशभूषादमदार संगीतकलाकारांची फौज असूनसुद्धा कलंक’ प्रेक्षकांच्या मनावर भिडत  नाही.

 

चित्रपट – कलंक

निर्मिती – करण जोहरसाजिद नादियाडवाला,अपूर्व मेहता

दिग्दर्शक -अभिषेक वर्मन

संगीत – प्रीतम

कलाकार – वरुण धवनआलिया भटमाधुरी दीक्षितसंजय दत्तआदित्य रॉय कपूरसोनाक्षी सिन्हाकुणाल खेमूहितेन तेजवानीअंचित कौर.

 

रेटिंग – **

–     भूपाल पंडित , चित्रपट समिक्षक