लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस नाईकावर गुन्हा दाखल

733

मल्हार न्यूज, नाशिक प्रतिनिधी

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करण्यासाठी ३०,००० हजार रुपयांची मागणी केल्याने वावी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अजित किशोर जगधने ब.नं. १८०४, नेमणूक वावी पोलीस ठाणे , नाशिक ग्रामीण यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८(संशोधन सन २०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक विश्वजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध वावी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्याचे निमित्ताने वावी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार अडांगळे यांना मदत करण्यास सांगण्याचे मान्य करून पोलीस नाईक अजित किशोर जगधने यांनी ३०,००० हजार रुपयांची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध वावी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाने गुन्हा दाखल केला आहे.

  याप्रकरणी पुढील तपास सुरु असून नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.