‘आम्ही दोघी’ या मालिकेचे २५० भाग पूर्ण

664

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

‘झी युवा’ ही मराठी वाहिनी, प्रेक्षकांसाठी नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येते. दोन बहिणींच्या अतूट प्रेमाची कहाणी असलेली ‘आम्ही दोघी’ ही मालिका यांपैकीच एक आहे. प्रसिद्धी, विवेक सांगळे आणि खुशबू तावडे यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिकाआहेत. मोठ्या बहिणीची धाकट्या बहिणीवर असलेली माया, कौटुंबिक जिव्हाळा अशा सगळ्याच गोष्टी या मालिकेतून पाहायला मिळतात. त्यामुळेच प्रेक्षकांना ही मालिका आपलीशी वाटली. प्रेक्षकांच्या या प्रेमाच्या जोरावर आज ‘आम्ही दोघी’ या मालिकेने अडीचशेभागांचा टप्पा ओलांडला आहे.         या मालिकेचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग तयार झाला आहे. निश्चितपणे या मालिकेच्या यशात चाहत्यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. प्रत्येकच यशस्वी पायरी उत्साहाने साजरी केली जाणाऱ्या ‘आम्ही दोघी’च्या सेटवर २५० भाग पूर्ण होण्याचा मोठा उत्साह दिसतहोता. मालिकेने मिळवलेले हे यश, फारच धुमधडाक्यात साजरे केले गेले. पडद्यावर दिसणाऱ्या सर्व कलाकारांनी, पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्व टीमचे मनापासून आभार मानले. भूमिकेचे नाव ही आमची ओळख बनून जाते, याचा अधिक आनंद होतो असंसगळ्यांनीच आवर्जून सांगितलं. आमची ही ओळख निर्माण होण्यात सर्वच टीमचा महत्वाचा वाटा असतो, हे सांगायलादेखील कुणी विसरलं नाही. मजामस्तीच्या, हलक्याफुलक्या वातावरणात, संपूर्ण टीमने केक कापून हे यश साजरे केले. यापुढेही मालिका प्रेक्षकांनाअसाच आनंद देत राहील याची खात्री आहे. मालिकेच्या या यशाविषयी बोलताना, अभिनेत्री खुशबू तावडे म्हणते;”२५० भागांचा टप्पा गाठणे, ही आमच्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची बाब आहे. हे यश मिळवण्यासाठी आम्हाला सतत प्रोत्साहन देणाऱ्या व आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानते. एक कलाकार म्हणून खूप काही शिकण्याची, उत्तमअनुभव घेण्याची संधी या मालिकेमुळे आम्हाला मिळाली. आमच्या या यशात पडद्यामागच्या कलाकारांचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा असतो. त्यांच्यामुळेच ही मालिका एवढे मोठे यश मिळवू शकली. या सगळ्यांचे मी आज आभार मानते. हे यश सगळ्यांचे आहे, त्यामुळेच सेटवरच्या सर्वांनी मिळून केक कापला आणि हा आनंद साजरा केला.”