28 एप्रिल ला सोशल मिडिया डॉक्यूमेंट्री चे उद्घाटन

1007

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

आजची तरुण पिढीने सोशल मिडियाचा सकारात्मक वापर कसा करावा हे त्यात दाखविण्यात आले आहे.सोशल मिडियाचे फायदे आपापल्या क्षेत्रात कसे करता येईल हा ह्या डॉक्यूमेंट्रीचा  मुळ उद्देश आहे.तसेच यामध्ये विविध उदाहरणे घेऊन चित्रीकरण केले आहे.ही डॉक्यूमेंट्री 30 मिनिटांची आहे व प्रथमच असा वेगळा विषय दिग्दर्शकाने निवडला आहे.
            तसेच या स्क्रिनींग ला श्याम मनोहर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक ,नरेंद्र भिडे – संगीत दिग्दर्शक,प्रकाश मगदूम – डायरेक्टर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय,मेघराज राजेभोसले – अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ,निलांबरी जोशी – प्रसिद्ध लेखिका, संगणक तज्ञ,मुक्ता चैतन्य – ब्लॉगर, सोशल मीडिया अभ्यासक,शरद तांदळे – बेस्टसेलर पुस्तक लेखक, उद्योजक,राधिका फडके – पुणे जिल्हा सायबर सेल, इनस्पेक्टर,संजय जोशी – पुस्तक क्रिटीक,अजय दुधाने – भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले सायबर व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक, समाजसेवक तेजश्री कांबळे – आकाशवाणी पुणे, प्रोग्राम प्रोड्युसर, निवेदिक,अमोल उदगीरकर – प्रसिद्ध चित्रपट समीक्षक व लेखक,शैलेश बोभाटे – वज्रा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, मोटिव्हेशनल स्पिकर,अजित केरूरे – कडक स्पेशल,सचिन केळकर – भारतातील प्रचंड लोकप्रिय व लाइक्स असलेली सर्व क्षेत्रांतील 26 पेजेस चे अ‍ॅडमिन, फेसबुक ला भेट देणारे भारतातील 10 व्यक्तींमध्ये सामावेश, जगभरातील 17/18 कंपण्यांना टेक सोल्युशन अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
            येत्या 28 एप्रिल ला दुपारी 2 वाजता राष्ट्रीय फिल्म संग्रहालय ,पुणे येथे याचे स्क्रिनिंग होणार आहे.प्रवेश विनामुल्य असून पुणेकरांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा असे आव्हाहन करण्यात आले आहे .याचे आयोजन श्रीपद्मा पब्लिसिटी यांनी केले आहे.