पोलीस दलात चाललंय काय? लाच प्रकरणाने पोलीस दलात खळबळ; तिसरी घटना

797

मल्हार न्यूज, नेटवर्क

एकापाठोपाठ तीन लाच घेण्याच्या घटना घडल्याने पुणे शहर पोलीस दल आणि ग्रामीण पोलीस दलात खळबळ माजली आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास 2000 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे

याबाबत पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरी प्रकरणी कारवाई न करण्याकरिता ५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून २ हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. करीम मोहम्मद शरीफ शेख (४७, पोलिस हवालदार बक्‍कल नंबर ५३०९, येरवडा पोलिस स्टेशन) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय युवकाने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीची एसीबीने पडताळणी केली असता त्यात तथ्य असल्याने, ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदारावर मोबाईल चोरी प्रकरणी कारवाई न करण्यासाठी पोलिस हवालदार करीम शेख यांनी त्यांच्याकडे ५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. पण तक्रारदार आणि लाचखोर पोलीस यांच्यात तडजोडी अंती २ हजार रूपयांवर तडजोड झाली. तक्रारदाराची लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी एसीबी पुणे यांच्याकडे तक्रार दिली होती.यानुसार अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचला. त्यावेळी पोलिस हवालदार करीम शेख यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून २ हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक दिलीप बोरस्ते, उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपाधीक्षक प्रतिभा शेंडगे, पोलिस निरीक्षक राजू चव्हाण, पोलिस हवालदार शेळके आणि पोलिस कर्मचारी अभिजीत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.