लग्नाची मागणी केली म्हणून प्रियकराने प्रियसीला दिले चटके

744

पिंपरी (मल्हार न्यूज नेटवर्क)

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासारवाडी येथे लग्नाची विचारणा केली म्हणून प्रियकराने प्रियसीला चटके देण्याची घटना घडली आहे. प्रियकर एवढयावर न थांबता तिच्या घरी जाऊन तिचा विनयभंग करून  प्रियकराच्या वडिलांनी देखील तिला मारहाण करून समाजात बदनामी करत धमकी दिली म्हणून २३ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. तर अमित मोहन लाड व त्याचे वडील मोहन लाड (रा. रामराज्य बिल्डिंग, कासारवाडी, पुणे) यांच्या विरुद्ध भां.द.वि.३५४,३२४,३२३,३३७,५०४,५००,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१४ पासून ते १३ एप्रिल २०१९ पर्यंत सुरू होता.

भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व अमित लाड यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. यामुळे मुलीने अमितला लग्नाची गळ घातली. पण त्याने तिच्याशी लग्न केले नाही. सन २०१८ मध्ये ती त्याला नाशिक फाटा येथील एसटी स्टँड वर लग्नाबाबत विचारणा करण्यासाठी गेली असता अमितने तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्याच्या टू व्हीलर गाडीची चावी लाईटवर गरम करून चटके दिले. त्यानंतर तो निघून जात असताना तिने गाडी पकडून ठेवलेली असल्याचे माहित असताना देखील त्याने तिला फरफटत नेले.यामुळे तिच्या दोन्ही पायांना खरचटले होते.

तसेच १३ एप्रिल रोजी अमित तिला भेटण्यासाठी घरी गेला. तेथे त्याने तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. अमितचे वडील मोहन लाड यांनी देखील तिला शिवीगाळ करत नातेवाईकांमध्ये बदनामी केली म्हणून तरुणीने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टोके करत आहेत.