व्हाटस अॅप द्वारे अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्यावर गुन्हा दाखल

697

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीने ३० वर्षीय महिलेस व्हाटस अॅप द्वारे अश्लील मेसेजेस करून व्हिडीओ कॉल करणाऱ्यावर वाकड पोलीस ठाण्यात भां.द.वि ३५४,३५४अ, आयटी का.क. ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समता कॉलनी, रहाटणी येथे ६ मे रोजी अनोळखी व्यक्तीने ७७५७८९९५२५ या नंबरवरून ३० वर्षीय महिलेस व्हाटस अॅप द्वारे कॉल करून अश्लील मेसेज केले. तो एवढ्यावरच न थांबता त्याने संबंधित महिलेस व्हिडीओ कॉलींग करून स्वत: नग्न होऊन अश्लील चाळे करू लागला.यामुळे महिलेच्या मनास लज्जा निर्माण झाली.यावरून महिलेने वाकड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मोमीन करत आहेत.