मत्स्य विकास अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

779

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

मत्स्य व्यवसाय विकास केंद्र हडपसर, पुणे येथील  मत्स्य व्यवसाय विकास आधिकारी जनक मल्हारी भोसले वय 54 वर्षे यांना तलावाचा ठेक्याच्या बदल्यात १५००० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार हे मत्स्य व्यवसाईक संस्थेचे सचिव आहेत.त्यांचा मत्स्य व्यवसायाचा ठेका आहे. त्यांच्या संस्थेस यापूर्वी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जनक भोसले यांच्या मार्फत तलाव ठेका मंजूर केला होता. मत्स्य व्यवसायाचे विकास अधिकारी भोसले यांनी मंजूर झालेल्या तलाव ठेक्याच्या मोबदला म्हणून २०,००० हजार रुपयांची लाच मागीतली. भोसले आणि तक्रारदार यांच्यात झालेल्या तडजोडी अंती १५,००० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. पण तक्रारदार यांची लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभागाकडे  तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता त्यात तथ्य असल्याने त्यांनी सापळ्याचे आयोजन केले. त्यानुसार मत्स्य विभाग कार्यालय, हडपसर येथे तक्रारदाराकडून १५,००० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जनक मल्हारी भोसले यांना रंगेहात पकडण्यात आले. अधिकाऱ्याला कार्यालयातच लाच स्वीकारताना पकडल्याने खळबळ माजली आहे.

  सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण आणि पोलीस उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घाडगे, पोलीस नाईक झगडे,गोसावी यांच्या पथकाने केली.