श्रेयस देशपांडे यांचे “सेहमा सा” प्रदर्शीत

710

मल्हार न्यूज (ऑनलाईन)

सध्या जुनी गाणी नव्या पद्धीतीने रसिकांसमोर आणण्याचा ट्रेंड जोरात आहे.अश्या स्थितीमध्ये श्रेयस देशपांडे आपल्यासाठी पूर्णपणे नवीन असं गाणं घेऊन आपल्या भेटीला आले आहेत. आजवर अनेक मराठी अल्बम करणाऱ्या श्रेयसचे हिंदी गाणे  9 मे रोजी youtube वर प्रदर्शित झालं आहे. ‘सेहमा सा’ असे गाण्याचे बोल आहेत. श्रेयस नी या गाण्याला स्वरबद्ध करून ते लिहिले देखील आहे. 
“कुछ बाते बोयी सपने बनके सोयी 
अब ना लागे जिया तेरे बिन 
होके तुझसे खफा खामोशी का हुआ 
अब ये रैना लागे ना तेरे बिन ..!”
अशा ह्या गाण्याच्या सुंदर ओळी प्रत्येक वयोगटाच्या व्यक्ती च्या मनाला भुरळ घालतात..
गाण्याला उत्तम असा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळत आहे आणि संगीत क्षेत्रातील अनेकांनी या गाण्याचे तोंड भरून कौतुक केले आहे. श्रेयस देशपांडे या गाण्याबद्दल बोलताना सांगतात कि ” हे गाणं माझं पाहिलं पाहिलं गाणं आहे.. आणि पहिल्याच प्रयत्नात इतका चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळेल अशी आशा नव्हती.. पण गाणं लोकांच्या पसंतीस उतरत आहेत याबद्दल खूप आनंद होतो आहे.”
 ‘सब कुछ श्रेयस ‘अशी या व्हिडिओची खास ओळख असणार आहे.  या व्हिडिओच संपादन आणि छायाचित्रण पियुष बुन्दिले यांचे आहे. कला श्रेयस भागवत, सिद्धेश शिंदे,यश तोडकर तर करण चिंचोले ,अविनाश मोतेवार,कृष्णा नरोटे,अनिकेत पाटील या टीम चे सहकार्य लाभले आहे.