इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग; पुणे प्राईड संघाचा विजय, अब्दुल शेखची चमक

658

मल्हार न्यूज (ऑनलाईन)

अब्दुल शेखने (27 गुण) आपल्या आक्रमक चढायांच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेच्या पहिल्या सत्रातील उदघाटनीय सामन्यात पुणे प्राईड संघानेहरयाणा हिरोज संघाविरुद्ध 43-34 असा विजय मिळवला.अब्दुल शेखच्या आक्रमक चढायामुळे त्याची सामनावीर आणि सर्वोत्तम चढाईपटू म्हणून   निवडण्यात आले.     पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील उदघाटनीय सामन्यात हरयाणा हिरोज आणि पुणे प्राईड संघामध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली.सामन्याच्या सुरुवातीलापुणे प्राईड संघाने 6-5 अशी आघाडी घेतली. त्यांनी पहिल्या क्वार्टर अखेरीस 9-7अशी पुण्याकडे आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये          7 अशी पुण्याकडे आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये हरयाणा संघाने सामना 10-10 असा बरोबारीत आणला.

यानंतर दोन्ही संघाकडून चढाई पटूंनी गुण न मिळवल्याने सामना 11-11  अस्सा बरोबरीत होता. यानंतर मात्र   हरयाणा हिरोजच्या चढाई व बचावपटूनी चमक दाखवत 17- 13 अशी आघाडी दुसऱ्या क्वार्टरमध्ये हरयाणा संघाने आघाडी घेतली.     तिसऱ्या क्वार्टरमध्ये पुण्याच्या अब्दुल शेखने चढाईत चमक दाखवत संघाला आघाडी मिळवून दिली.एकवेळ पिछाडीवर असणारा पुणे प्राईड संघाने 26-20 अशी आघाडी घेतली पण, अक्षय बोडकेने  काही चांगले बचाव करत हरयाणा संघाची आघाडी 20 अशी घेतली. पण, अक्षयबोडकेने काही चांगले बचाव करत हरयाणा संघाची आघाडी 24-27 अशी कमी केली. पण, अब्दुल शेखने बोडकेला बोनस गुणांसह बाद करत पुण्याला 29- 25 अशी आघाडी मिळवून दिली.तिसऱ्या क्वार्टर अखेरीस पुण्याने ही आघडी कायम ठेवली.    चौथ्या क्वार्टरमध्ये अब्दुल शेखने आपला हाच फॉर्म कायम ठेवत संघाच्या गुणांमध्ये भर घालणे सुरुच ठेवले.अब्दुलला बाद करत हरयाणाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्नकेला.त्यांनी आघाडी 31- 37 अशी कमी केली.पण, मैदानात,पुन्हा  मैदानात पुन्हा परतलेल्या अब्दुलने जयवंत बोडके व जगदीप नरवालला बाद केले व पुण्याची आघाडी 3331 अशी केली. जसकीरत सिंगनेदेखील अब्दुलला चांगली साथ दिले. पुण्याच्या संघाने अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत हरयाणाला पराभूत केले.