Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेडेरिंगबाझ अमोल कागणे आणि प्रतीक्षा मुणगेकर

डेरिंगबाझ अमोल कागणे आणि प्रतीक्षा मुणगेकर

मल्हार न्यूज (ऑनलाइन),पुणे

अलीकडे कलाकार बॉडी डबल न वापरता स्वतःच अक्शन सिक्वेन्स करण्यास प्राधान्य देतात. हिंदीतील अनेक कलाकार आपल्या फिटनेसच्या जोरावर कठीण-कठीण स्टंट्स अगदी सहज करताना दिसतात. मराठीतही हा ट्रेंड हळूहळू रुळू लागला असून या यादीत अमोल कागणे आणि प्रतीक्षाचं नाव समाविष्ट झालय.

‘बाबो’ या चित्रपटात अमोल कागणे एक कम्प्लिट सरप्राईझ पॅकेजच असणार आहे.

चित्रपटाच्या मागणीला मन देत, अमोलने ‘बाबो’साठी केवळ ७ किलो वजनच नाही घटवलं तर अँक्शन सिन्सही स्वतःच करण्यावर भर दिला. कथेनुसार, एका सीनमध्ये अमोल आणि प्रतीक्षाला तब्ब्ल ४ तास जमिनीपासून १६ फूट उंच असणाऱ्या झाडावर बसावं लागलं होतं. साधारण लांबलचक ४ पानी सीन्सचा चॅलेंज अमोलने प्रतीक्षाने केवळ घेतलाच नाहीत तर यशस्वीरीत्या  सुद्धा केलाय.  ५ तास झाडावर टेक-रिटेक देत, “एक अप्रतिम शॉट तर दिलाच पण आम्ही एकमेकांसोबत टाइम स्पेंट करू शकलो शिवाय आमच्या गप्पा इतक्या रंगल्या ज्या आम्हाला आमच्या गतकाळात घेऊन गेल्या. शालेय जीवनातल्या गप्पांचा फड रंगला आणि त्यातच आम्ही इतका कठीण सीन कुठलेही बॉडी डबल्स न वापरता स्वतः केलेत” असं अमोल कागणे म्हणाले.

‘बाबो’ ३१ म पासून आपल्या जवळच्या चित्रपटात प्रदर्शित होणार असून नवनव्या युक्त्या लढवत दिग्दर्शकाने हा चित्रपट विनोदी पद्धतीने अगदी उत्तम हाताळला आहे. प्रेक्षकांनाही ‘बाबो’ नकीच आवडेल. त्याआधी चित्रपटातील धमाकेदार गाणी सगळ्या म्युझिक चॅनेल्सवर उपलब्ध असून तुम्हीही खास झलक पाहूच शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!