शैक्षणिक क्षेत्रात करीयर घडविण्यास पालकांनी काळजी घ्यावी:- जोशी

625

“सुतारदरा येथे सुरक्षितते व जनजाग्रुतीचे मार्ग दर्शन”

पौडरोड, वार्ताहार,

पौडरोड वरील सुतार दरा गेल्या काही वर्ष यापासून गुन्हेगारी वाढल्याचे गुन्हेगारांना या प्रव गुन्हेगारांना गुन्हेगारीपासुन पराव्रुत्त करण्यासाठि पालकांनी प्रयत्न करावा .कोथरूड पोलीस स्टेशन, प्राधिकरण नागरी सुरक्षा स्वयंसेवक पोलीस मित्र संघटना , सुतारदरा भागातील नागरीक व्यापारी मित्र रिक्षा चालक यांनी एकत्र येऊन या भागातील नागरिकांनासाठी समर्थ काँलनी चार नळ चौकात सुरक्षिततेविषयी जनजाग्रुती मार्गदर्शन करण्यात आले .

या भागातिल नागरिकांनाकडून पोलीस चौकीसाठी वारंवार होत असलेली मागणी लक्षात घेऊन त्यावर लवकरात लवकर पोलीस चौकी सुरू कर.तसेच महीलांच्या सुरक्षिततेविषयी काळजी घेण्याचे आवाहन केले . प्रत्येक गल्लीतील जबाबदारी त्याच गल्लीतील नागरिकांनी घ्यावी . घरफोड्या पेट्रोलचोर्या मारामार्या सीसीटीव्ही बसविल्यास गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल. सीसीटिव्ही साठी लागणारी मदत स्वस्त मिळवुण देण्याची जबाबदारीही जोशी यांनी घेतली.
चौकट:- या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत नागरिकांना मार्गदर्शन करतांना प्रतिभा जोशी म्हणाल्या की, आपणच आपली सुरक्षिततेविषयी जाग्रुत राहीले पाहीजे आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना इंजिनियर डाँक्टर , आर्मी , नेव्ही , वकील , प्राध्यापक , व्यवसायिक , आयटी क्षेत्रात शैक्षणिक करीयर घडविण्यास पालकांनी काळजी घेतली पाहिजे काही अडचण असल्यास त्या स्वतः अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार याची ग्वाही दिली .

अखिल सुतारदरा नागरिक विकास मंचाचे अध्यक्ष अशोक शेलार म्हणलेकी, नागरिकांनी गुन्हेगारांना गुन्हेगारीपासुन पराव्रुत्त करण्यासाठि पालकांनी प्रयत्न करावा . प्रत्येक गल्ली मधे सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न करावा , प्रत्येक घरातील व्यक्तींचा यात सहभाग असणे महत्वाचे आहे , सीसीटिव्ही म्हणजे तिसरा डोळा , कोथरूड भागात सर्वच मुख्य ठिकाणी सीसीटिव्ही बसविल्यास पोलीसांना तपासातील अडथळे दुर होऊ शकतो.

या कार्यक्रमाचे नियोजन पोलीस मित्र संघटनेने केले यात नागरिकांच्या समस्यांवर समाधानकारक उत्तरे मिळाली याठिकाणी सुरेश काळे काका यांनी प्रतिभा जोशी यांच्या सत्कार केला. अध्यक्ष संदिप नाना कुंबरे यांनी आभार मानले यावेळेस संदिप जाधव, अशोक शेलार, संतोष घारे,मावशी राधा पवार तसेच या भागातील नागरिकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.